Headlines

शिवना येथील स्मशानभूमीची दुरवस्था; तातडीने निधी उपलब्ध करण्याची मागणी:ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष; शेवटच्या प्रवासातही सोसाव्या लागतात नरकयातना‎



सिल्लोड तालुक्यातील शिवना येथे गावतलावाला लागून असलेल्या जंगलातील स्मशानभूमीची दयनीय अवस्था झाली आहे. अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना येथे मूलभूत सुविधांअभावी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. वारंवार तक्रारी करूनही ग्रामपंचायत प्रशासनाकडून कोण

.

स्मशानभूमी परिसरात मोठ्या प्रमाणावर झाडे-झुडपे, वेली आणि गवत वाढल्याने जंगली व हिंस्त्र प्राण्यांचा धोका निर्माण झाला आहे. जागोजागी कचऱ्याचे ढीग साचल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. पावसाळ्यानंतर परिस्थिती अधिकच बिकट होत असून, अंत्यसंस्कारासाठी जाताना नागरिकांना चिखल तुडवत खडतर मार्ग पार करावा लागतो. याशिवाय परिसरात रात्रीच्या वेळी प्रकाश व्यवस्थेचाही मोठा अभाव आहे. नागरिकांसाठी अत्यंत संवेदनशील व मूलभूत असलेली ही सुविधा असूनही प्रशासनाकडून याकडे साफ दुर्लक्ष होत आहे. राज्याच्या ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान २०२५-२६’ मध्ये ग्रामीण भागातील स्मशानभूमी विकासाचा स्पष्ट समावेश आहे. ग्रामस्थांनी तातडीने स्वच्छता, रस्ता, शेड दुरुस्ती व विजेची सोय करण्याची मागणी केली आहे. स्मशानभूमी परिसर तातडीने स्वच्छ करण्यासाठी व आवश्यक कामांसाठी ठराव घेतला जाईल, असे ग्रामपंचायत सदस्य विनायक काटकर यांनी सांगितले.

दुरुस्तीसाठी ग्रामपंचायत स्तरावरून निधी देणार गावातील स्मशानभूमीची पाहणी करून शेड व परिसराच्या दुरुस्तीसाठी ग्रामपंचायत स्तरावरून तातडीने निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे शिवना येथील ग्रामसेवक आर.जी. गंगावणे यांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *