Headlines

‘जय भीम’ ही आधुनिक नव्या भारताच्या उभारणीची ऊर्जा- ॲड. यशोमती ठाकूर, क्रांतीपर्व महोत्सव, महिलांची उपस्थिती; बुद्ध-भीम गीतांनी दुमदुमला परिसर‎




जय भीम हा अभिवादनाचा शब्द नाही, तर तो सामाजिक परिवर्तनाची प्रखर ऊर्जा आहे. समानता, स्वातंत्र्य, बंधुतेचा संदेश या एका घोषवाक्यात सामावलेला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची प्रेरणा ‘जय भीम’मधून प्रत्येकाच्या मनात चेतना निर्माण करते. अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद, शिक्षणाची जिद्द आणि स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा ‘जय भीम’ या मंत्रातूनच मिळते. त्यामुळे ‘जय भीम’ ही नव्या भारताच्या उभारणीची शक्ती आहे,” असे प्रतिपादन अॅड. यशोमती ठाकूर यांनी केले. नांदगाव पेठ येथे आयोजित क्रांतीपर्व या वैचारिक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरूनत्या बोलत होत्या. सम्राट अशोक, क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त प्रज्ञास्पर्श बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने ग्रामपंचायत पटांगणात या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅड. यशोमती ठाकूर उपस्थित होत्या. प्रमुख अतिथी म्हणून कैलाश मोरे, प्रशासक कविता डांगे, सभापती हरीश मोरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनेश दहातोंडे, भारतीय दलित पँथरचे प्रदेशाध्यक्ष प्रभाकर शेंडे, विनोद डांगे, नितीन हटवार, गंगाधर खडसे, श्रीधर राऊत, प्रा. मोरेश्वर इंगळे,वृषाली इंगळे, राजेश बोडखे, श्याम देशमुख पुसदेकर, अर्जुन युवनाते, योगेश ठवळी, संस्थेचे अध्यक्ष अण्णाजी कांबळे, प्रमोद कडू उपस्थित होते. यावेळी कैलाश मोरे यांचा ‘समाजरत्न’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. ‘युवा उद्योजक’, ‘युवा भूषण’, ‘सेवा’ पुरस्कार देऊन युवकांना गौरवले. गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात सप्तखंजिरी वादक तुषार सूर्यवंशी यांचा प्रबोधनपर कार्यक्रम तर गायिका प्रतीक्षा डांगे, भूषण रायबोले व प्रशांत गवई यांनी सादर केलेल्या बुद्ध-भीम गीतांनी मंत्रमुग्ध केले. संपूर्ण परिसर ‘जय भीम’च्या जयघोषाने आणि प्रेरणादायी गीतांनी दुमदुमून गेला. या कार्यक्रमाला नांदगाव पेठसह परिसरातील अनुयायी, नागरिक आणि महिलांची उपस्थिती होती.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *