Headlines

महावितरणच्या 'सेवा सेतू' व 'सेवा संकल्प' अभियानाचा शुभारंभ:ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते उद्घाटन




प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक व घटनात्मक पदावरील 25 वर्षांच्या कार्यकाळाचे औचित्य साधून वीजग्राहकांना जलद आणि सुलभ सेवा पुरवण्यासाठी महावितरणतर्फे प्रत्येक तालुक्यात ‘सेवा सेतू’ आणि ‘सेवा संकल्प अभियान’ सुरू करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात उभारण्यात आलेल्या विशेष सेवा कक्षाचे उद्घाटन ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते पार पडले. केंद्र व राज्य सरकारच्या वीजविषयक सर्व योजनांचा लाभ पात्र ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे अभियान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगत, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यात सक्रिय सहभाग नोंदवून मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन राज्यमंत्री बोर्डीकर यांनी केले. एकाच छताखाली मिळणार ‘या’ सुविधा: जिह्यातील प्रत्येक तालुक्यात सुरू करण्यात आलेल्या सेवा कक्षांद्वारे ग्राहकांना खालील विविध सेवा आणि मार्गदर्शन पुरवले जाणार आहे: वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अभियानाचा आढावा: महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या नेतृत्वात राबवल्या जाणाऱ्या या अभियानाचा आढावा संचालक धनंजय औंढेकर, राजेंद्र पवार व सचिन तालेवार यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतला. या अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शहरी व ग्रामीण भागातील प्रत्येकी दोन मंडळांचा विशेष गौरव करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. सुविधांचा लाभ घ्यावा कार्यक्रमाला आमदार सुहास शिरसाठ, आमदार अनुराधा चव्हाण, महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक गजेंद्र बावणे, प्रभारी मुख्य अभियंता मनीष ठाकरे, अधिकारी व सौर पुरवठादार एजन्सीचे प्रतिनिधी उपस्थित होते. महावितरणने सर्व नागरिकांना एकाच छताखाली उपलब्ध असलेल्या या सुविधांचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *