Headlines

Rohit Pawar Targets MPSC Chief Vivek Bhimanwar Over Office Rent Controversy


महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) कारभारावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आयोगाचे अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप केले आहेत. आयोगाचे बेलाप

.

रोहित पवार यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं बेलापूर इथं प्रशस्त ऑफिस असताना देखील भ्रष्ट अध्यक्ष भिमनवार साहेबांसाठी कफ परेडच्या वर्ल्ड ट्रेड सेंटर इथं सेंटर वन बिल्डिंगला 12 व्या मजल्यावर 4000 sq. ft.चं ऑफिस घेतलं आहे.” या कार्यालयाचे मासिक भाडे साधारण 10 लाख रुपये असल्याचाही दावा त्यांनी केला आहे.

‘गोरगरीब विद्यार्थ्यांकडून परीक्षा फी घेता आणि स्वतःसाठी…’

रोहित पवार यांनी या कथित खर्चावरून आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केला आहे. गोरगरीब विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेतले जाते आणि दुसरीकडे अध्यक्षांसाठी लाखो रुपयांचे कार्यालय घेतले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

“एकीकडे आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह असताना अध्यक्ष मात्र अशाप्रकारे उधळपट्टी करत आहेत. गोरगरीब विद्यार्थ्यांकडून एकेक हजार रुपये परीक्षा फी घेता आणि दुसरीकडे मात्र स्वतःसाठी 10 लाख रुपये प्रतिमहिना भाडं असलेलं ऑफिस घेता, हे शोभतं का?”, असा सवाल पवार यांनी केला.

‘आयोगाचं कार्यालय बेलापूरला, अध्यक्ष कफ परेडला?’

आयोगाचे मुख्य कार्यालय बेलापूर येथे असताना अध्यक्षांसाठी कफ परेडमध्ये स्वतंत्र कार्यालय घेण्याची गरज काय, असा प्रश्नही रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. या कार्यालयाच्या माध्यमातून मंत्रालय परिसरातील राजकीय हालचालींसाठी सोय केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये “राजकीय खलबतं करता यावीत, कलेक्शनचं गणित आखता यावं यासाठी मंत्रालय परिसरात हे नवं ऑफिस घेतलंय का?” असा सवाल केला. तसेच आयोगाचा कारभार बेलापूर येथून आणि अध्यक्ष कफ परेड येथून चालणार असल्यास प्रशासन कसे चालेल, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

भिमनवारांच्या राजीनाम्याची मागणी

रोहित पवार यांनी यापूर्वीही MPSC अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. MPSCच्या परीक्षांमधील कथित अनियमितता आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही मागणी लावून धरली आहे.

दरम्यान, भिमनवार यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळले आहेत. ड्रग इन्स्पेक्टर परीक्षेतील पेपरफुटीच्या प्रकरणात आपण अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वीच घटना घडली होती, असे त्यांनी म्हटले आहे. पुरावे दिल्यास राजीनामा देण्याची तयारी असल्याचेही त्यांनी सांगितल्याचे वृत्त आहे.

हेही वाचा…

अभिजीत दीपकेंच्या आरोपांवर संजय निरुपमांचा पलटवार:‘या जोकरांना दुसरा जन्म घ्यावा लागेल’, शिवसेनेच्या कामगिरीचे आकडेही मांडले

कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी शिवसेना आणि भाजपवर गंभीर आरोप केल्यानंतर आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांनी सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून दीपके यांच्या आरोपांवर निशाणा साधला. शिवसेना ही कोणाचीही ‘शेल कंपनी’ किंवा ‘प्रॉक्सी पार्टी’ नसल्याचे सांगत निरुपम यांनी पक्षाच्या निवडणूक कामगिरीचे आकडेही मांडले. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.