Headlines

Pune To Host UCI Road World Championship 2032



पुण्याला 2032 यूसीआय रोड वर्ल्ड चॅम्पियनशिपचे यजमानपद मिळाले आहे. भारताला प्रथमच या मोठ्या सायकलिंग स्पर्धेचे आयोजन करण्याची संधी मिळाली आहे. यामुळे पुणे जागतिक सायकलिंगच्या नकाशावर आले आहे. कॅनडातील मॉन्ट्रियल येथे झालेल्या यूसीआय काँग्रेसमध्ये याची

.

महाराष्ट्र सरकार आणि सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाने भारत सरकारच्या मदतीने यासाठी उमेदवारी अर्ज सादर केला होता, जो यशस्वी झाला. या यजमानपदासाठी पुणे आणि नेदरलँड्समधील ग्रोनिंगेन/ड्रेंथे हे शेवटचे दोन दावेदार होते.

यापूर्वी 4 ते 6 सप्टेंबर दरम्यान यूसीआयच्या तीन सदस्यांच्या टीमने पुण्याला भेट दिली होती. त्यांनी बालेवाडी क्रीडा संकुल, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसर, स्पर्धेसाठी प्रस्तावित मार्ग, हॉटेल्स आणि इतर सुविधांची पाहणी केली होती. पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे महासचिव मनिंदर पाल सिंग यांनी अंतिम सादरीकरण केले.

पुण्याच्या उमेदवारीमागे बजाज पुणे ग्रँड टूरचा अनुभव महत्त्वाचा ठरला. 2026 च्या ग्रँड टूरमध्ये 25 हून अधिक सरकारी विभागांनी एकत्रितपणे काम करून 437 किलोमीटरचे रस्ते शर्यतीसाठी तयार केले होते. या अनुभवाच्या आधारे 20232 पर्यंत पुण्यात जागतिक दर्जाची स्पर्धा आयोजित करण्याची क्षमता विकसित करण्याचे नियोजन आहे.

यूसीआय रोड वर्ल्ड चॅम्पियनशिप ही रोड सायकलिंगमधील सर्वात मोठ्या स्पर्धांपैकी एक आहे. जगभरातील आघाडीचे सायकलपटू यात सहभागी होतात. 2025 मध्ये किगाली येथे झालेल्या स्पर्धेत 113 देशांतील 734 सायकलपटूंनी सहभाग घेतला होता.

2032 ची ही स्पर्धा केवळ आंतरराष्ट्रीय स्पर्धा न ठेवता ‘पीपल्स रेस’ म्हणून विकसित करण्याचा प्रस्ताव आहे. यात स्थानिक नागरिकांचा सहभाग, महिला व युवा सायकलिंगला प्रोत्साहन, तळागाळातील प्रशिक्षण, प्रशिक्षक व तांत्रिक अधिकाऱ्यांचा विकास आणि क्रीडा पर्यटनाला चालना यावर भर दिला जाईल. प्रस्तावित मार्गातून पुण्याचे किल्ले, घाट, शेतजमिनी, ऐतिहासिक वारसा आणि तीर्थक्षेत्रे जगासमोर मांडण्याचे नियोजन आहे.

या स्पर्धेसाठी 25 लाखांपर्यंत प्रेक्षक येण्याची शक्यता उमेदवारी आराखड्यात व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे पुण्याला जागतिक क्रीडा, पर्यटन आणि प्रसारणाचे मोठे व्यासपीठ मिळेल.

2032 ची ही स्पर्धा भारताच्या 2026 ऑलिम्पिक यजमानपदाच्या महत्वाकांक्षेच्या दृष्टीनेही महत्त्वाची मानली जात आहे. पुण्याला जागतिक दर्जाच्या क्रीडा सुविधा, खेळाडू विकास आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्याचा अनुभव मिळवण्याची संधी मिळेल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *