Headlines

सोमेश्वर कारखान्याची निवडणूक बिनविरोध होणार? शरद पवारांचा पुढाकार:‘सिल्व्हर ओक’वर पवार कुटुंबाची महत्त्वाची बैठक




बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीला आता वेगळे राजकीय महत्त्व आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सहकार क्षेत्रातील ही पहिली मोठी निवडणूक होत आहे. त्यामुळे पवार कुटुंबातील दोन्ही बाजू आमनेसामने येण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी शरद पवार यांनी पुढाकार घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ येथे महत्त्वाची बैठक घेण्यात आली. ‘सिल्व्हर ओक’वर महत्त्वाची बैठक सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी शरद पवार यांनी ‘सिल्व्हर ओक’ येथे तातडीची बैठक बोलावली. या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे, खासदार पार्थ पवार, जय पवार आणि युगेंद्र पवार उपस्थित होते. या बैठकीत सोमेश्वर कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्याबाबत चर्चा झाली. शरद पवार यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी भूमिका मांडल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता पवार कुटुंबातील दोन्ही बाजूंमध्ये या निवडणुकीबाबत काय निर्णय होतो, याकडे लक्ष लागले आहे. युगेंद्र पवार आणि सुनेत्रा पवार गटाकडून तयारी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यावर सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संचालक मंडळ कार्यरत आहे. मात्र, बदललेल्या राजकीय परिस्थितीत कारखान्याची निवडणूक स्वतंत्रपणे लढवण्याची तयारी दोन्ही बाजूंकडून सुरू झाली होती. शरद पवार गटाकडून युवा नेते युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. दुसरीकडे सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालीही उमेदवारांच्या गाठीभेटी आणि निवडणुकीची तयारी सुरू होती. याशिवाय भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडूनही स्वतंत्र पॅनेल उभे करून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू असल्याचे सांगितले जात आहे. 21 जागांसाठी तब्बल 514 उमेदवारी अर्ज सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत एकूण 21 जागा आहेत. या 21 जागांसाठी तब्बल 514 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे. मात्र, निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न झाल्यास मोठ्या संख्येने दाखल झालेले उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया महत्त्वाची ठरणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026 आहे. त्यामुळे 30 सप्टेंबरपर्यंत दोन्ही बाजूंमध्ये चर्चा होऊन निवडणूक बिनविरोध करण्याबाबत सहमती होते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. वार्षिक अहवालातील फोटोवरूनही वाद दरम्यान, सोमेश्वर कारखान्याने प्रसिद्ध केलेल्या वार्षिक अहवालातील एका मुद्द्यावरूनही वाद निर्माण झाला होता. या अहवालामध्ये खासदार पार्थ पवार यांचा फोटो छापण्यात आला नव्हता. यावरून शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे यांनी टीका केली होती. त्यानंतर कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी या प्रकरणी दिलगिरी व्यक्त केली होती. त्यामुळे या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. 30 सप्टेंबरकडे सर्वांचे लक्ष सोमेश्वर कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आता शरद पवारांनी पुढाकार घेतला आहे. दुसरीकडे दोन्ही बाजूंकडून निवडणुकीची तयारीही सुरू झाली आहे. त्यामुळे आगामी काही दिवस या निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहेत. 30 सप्टेंबर ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असल्याने, तोपर्यंत शरद पवारांच्या पुढाकाराला यश येते का आणि सोमेश्वर कारखान्याची निवडणूक बिनविरोध होते का, याकडे बारामतीसह सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे. हेही वाचा…. दुष्काळाचा जीआर आजच निघण्याची शक्यता:माथाडी कामगारांसाठी वडाळ्यात 2850 घरांचा प्रकल्प; देवेंद्र फडणवीसांच्या मोठ्या घोषणा राज्यातील भीषण दुष्काळी परिस्थिती आणि नवी मुंबईतील माथाडी कामगारांचे प्रलंबित प्रश्न या दोन्ही अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मोठ्या आणि दिलासादायक घोषणा केल्या आहेत. दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचा शासन निर्णय (जीआर) आजच काढला जाईल, अशी शक्यता व्यक्त केली. तसेच, कै. अण्णासाहेब पाटील यांनी कष्टकऱ्यांसाठी बनवलेल्या माथाडी कायद्याचा गैरवापर करून स्वतःचे खिसे भरणाऱ्यांवर कठोर कारवाईचा बडगा उगारला जाईल, असा इशाराही फडणवीस यांनी दिला आहे. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *