Headlines

ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी उद्यापर्यंतची मुदत:अन्यथा 2 ऑक्टोबरपासून मुंबईतून देशव्यापी एल्गार; अभिजीत दिपकेंचा इशारा, संसदेपासून विधानसभेपर्यंत विरोधकांचे वादळ




मतदार यादीच्या विशेष सघन पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेवरून देशभरातील कोट्यवधी मतदारांची नावे वगळल्याचा आरोप करत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात देशभरात जनआक्रोशाचा भडका उडाला आहे. ‘कॉकरोच जनता पार्टी’चे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके यांनी ज्ञानेश कुमार यांना राजीनाम्यासाठी दिलेला 48 तासांचा अल्टिमेटम उद्या, 26 सप्टेंबर रोजी संपुष्टात येत आहे. “जर उद्यापर्यंत मुख्य निवडणूक आयुक्तांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला नाही, तर 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीच्या मुहूर्तावर मुंबईतून ऐतिहासिक देशव्यापी आंदोलनाचे रणशिंग फुंकले जाईल,” असा थेट इशारा अभिजीत दिपके यांनी दिला आहे. दरम्यान, या मुद्द्यावरून विरोधक अत्यंत आक्रमक झाले असून जम्मू-काश्मीर विधानसभेपासून ते थेट मुंबई उच्च न्यायालय आणि संसदेच्या उंबरठ्यापर्यंत निवडणूक आयोगाविरोधात तीव्र पडसाद उमटत आहेत. 13 कोटी मतदारांचे हक्क हिरावले; 2 ऑक्टोबरपासून मुंबईतून आंदोलनाची ठिणगी अभिजीत दिपके यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर (ट्विटर) सविस्तर भूमिका मांडत आंदोलनाची दिशा स्पष्ट केली. सीजेपीने दिलेल्या 48 तासांच्या अल्टिमेटमची मुदत उद्या संपत असून ज्ञानेश कुमार यांनी स्वेच्छेने पद न सोडल्यास लोकशाही वाचवण्यासाठी जनतेला थेट रस्त्यावर उतरावे लागेल. “2 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त मुंबईतून या व्यापक आंदोलनाची सुरुवात होईल. मुंबईनंतर हे आंदोलन देशातील सर्व प्रमुख महानगरांमध्ये आणि शहरांमध्ये तीव्र केले जाईल,” असा निर्धार दिपके यांनी व्यक्त केला आहे. एसआयआरच्या नावाखाली देशभरातील तब्बल १३ कोटींहून अधिक नागरिकांची नावे नियमबाह्य पद्धतीने मतदार यादीतून वगळण्यात आली असून, हा देशातील सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत मतदानाच्या हक्कावरील थेट दरोडा असल्याचा दावा करण्यात आला आहे. निवडणूक आयोगातील अंतर्गत बेबंदशाही चव्हाट्यावर; दोन आयुक्तांचे 14 आक्षेप ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या एका वृत्ताने निवडणूक आयोगाच्या अंतर्गत कामकाजातील गंभीर तणाव उघडकीस आणला आहे. गेल्या 10 महिन्यांत आयोगातील इतर दोन निवडणूक आयुक्तांनी एसआयआर प्रक्रियेतील त्रुटींवर तब्बल 14 लेखी आक्षेप नोंदवले होते. एकाच दिवशी चार गंभीर आक्षेप नोंदवूनही मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी त्याकडे दुर्लक्ष करत एकतर्फी 14 आदेश जारी केल्याचा खळबळजनक खुलासा झाला आहे. निवडणूक आयोगाने मात्र हे आरोप फेटाळत अंतर्गत चर्चा आणि मतभेद हा प्रशासकीय प्रक्रियेचा भाग असून सर्व अंतिम निर्णय नियमानुसार एकमतानेच घेतले जातात, असा दावा केला आहे. मुंबई उच्च न्यायालयात दोन स्वतंत्र याचिका महाराष्ट्रातील मतदार यादी पुनरीक्षणाच्या वैधतेवर आता कायदेशीर पेच निर्माण झाला आहे. एसआयआर प्रक्रियेची घटनात्मक वैधता, अंमलबजावणीतील त्रुटी आणि प्रक्रियेतील पारदर्शकता यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या दोन याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. दोन आयुक्तांचे आक्षेप डावलून काढण्यात आलेले सर्व 14 आदेश तातडीने रद्द करण्यात यावेत आणि आयोगाच्या बैठकीतील सर्व गोपनीय आक्षेप सार्वजनिक करावेत, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. जम्मू-काश्मीर विधानसभेत गोंधळ, महुआ मोईत्रांची पोलिसांत धाव या प्रकरणाचे राजकीय पडसाद देशभर उमटत आहेत. जम्मू आणि काश्मीर विधानसभेच्या कामकाजादरम्यान काँग्रेस आमदारांनी ‘ज्ञानेश कुमार यांनी तात्काळ राजीनामा द्यावा’ अशा आशयाचे फलक हातात घेऊन सभागृहात जोरदार घोषणाबाजी केली, ज्यामुळे सभागृहात मोठा गदारोळ झाला. तृणमूल काँग्रेसच्या (TMC) खासदार महुआ मोईत्रा यांनी दिल्लीतील पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्यात मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात अधिकृत फौजदारी तक्रार दिली आहे. कायदेशीर नियमांचे उल्लंघन करून पात्र मतदारांची नावे पद्धतशीरपणे वगळल्याचा ठपका त्यांनी ठेवला आहे. ज्ञानेश कुमार देशद्रोही, पुन्हा महाभियोग आणणार; राहुल गांधींचा घणाघात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या संपूर्ण प्रकरणावरून केंद्र सरकार आणि मुख्य निवडणूक आयुक्तांवर थेट तोफ डागली. “ज्ञानेश कुमार यांनी उघडपणे मतांची चोरी करून लोकशाहीची हत्या केली आहे. त्यांचा हा गुन्हा देशद्रोहासारखाच आहे. त्यांच्या नियुक्तीवेळीच मी विरोध नोंदवला होता, मात्र सरकारने विरोधी पक्षांचा आवाज दाबून ही नियुक्ती केली.” काँग्रेसच्या नेतृत्वाखालील ‘इंडिया’ आघाडी आता ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात पुन्हा एकदा संसदेत महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या जोरदार तयारीत आहे. यापूर्वी एप्रिल महिन्यात आणलेला प्रस्ताव संख्याबळाअभावी फेटाळला गेला असला, तरी आता समोर आलेल्या अंतर्गत पुराव्यांच्या आधारे विरोधक आक्रमक रणनीती आखत आहेत. ——————– हेही वाचा… काका आणि चुलत भावाशी 12 वर्षांपासून संबंध नाही!: माझ्या यशावर डल्ला मारण्याचा प्रयत्न नको; स्वीडनच्या नवनिर्वाचित खासदार नीला विखे पाटलांचा सुजय विखेंवर पलटवार स्वीडनच्या संसदेत नुकत्याच खासदार म्हणून ऐतिहासिक विजय मिळवणाऱ्या भारतीय वंशाच्या नीला विखे पाटील यांनी महाराष्ट्रातील आपल्या कुटुंबीयांच्या राजकीय वक्तव्यांवरून अत्यंत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “महाराष्ट्रात आमचा खासदार पराभूत झाला असला, तरी विखे कुटुंबातील मुलगी स्वीडनमध्ये खासदार झाली,” असा दावा करणाऱ्या माजी खासदार सुजय विखे पाटील आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर त्यांनी थेट तोफ डागली. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *