“राज्यातील सध्याची परिस्थिती पाहिली तर हा दुष्काळ 1972च्या ऐतिहासिक दुष्काळापेक्षाही महाभयंकर आहे. पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून बळीराजा हवालदिल झाला आहे. अशा संकटात शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्यासाठी आणि उपाययोजनांवर ठोस निर्णय घेण्यासाठी राज्य सर
.
आदित्य ठाकरे 8 जिल्ह्यांत थेट बांधावर जाणार
आदित्य ठाकरे यांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्याची माहिती देताना अंबादास दानवे म्हणाले, “आज आदित्य ठाकरे हे सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड आणि हिंगोली या पाच जिल्ह्यांमध्ये जात आहेत. तर उद्या परभणी, जालना आणि छत्रपती संभाजीनगर अशा तीन जिल्ह्यांचा दौरा करतील.”
“आमचे आजी-आजोबा आणि आई-वडील सांगतात की 1972 मध्ये भीषण दुष्काळ पडला होता; मात्र यंदाची परिस्थिती त्यापेक्षाही भयावह आहे. आम्ही सध्या विरोधी पक्षात आहोत, आम्ही थेट सरकारी तिजोरीतून मदत वाटू शकत नाही; पण शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांचे अश्रू पुसणे, त्यांचे मन हलके करणे आणि त्यांच्या व्यथा समजून घेऊन त्या सरकारसमोर मांडणे हे आमचे कर्तव्य आहे. त्यासाठीच आदित्य ठाकरे मैदानात उतरले आहेत.”

मुख्यमंत्र्यांनी एका तरी शेतकऱ्याशी संवाद साधला का?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दुष्काळ दौऱ्याची खिल्ली उडवत दानवे म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी चार दिवस दुष्काळी भागाचा दौरा केला असे सांगितले जाते. पण मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष कोणत्या शेतकऱ्याशी संवाद साधला? एका तरी शेतकऱ्याला समोर आणून दाखवावे, ज्याच्याशी मुख्यमंत्र्यांनी मोकळेपणाने चर्चा केली आहे.”
“दौऱ्यादरम्यान कडेकोट पोलीस बंदोबस्त, दोऱ्या आणि बॅरिकेड्स लावण्यात आले होते. राज्याच्या मुख्यमंत्र्याला जर सामान्य शेतकऱ्यांशी बोलायला बॅरिकेड्स लावावे लागत असतील, तर त्यांना नक्की कशाची भीती वाटते? याचाच अर्थ जनतेच्या मनात तीव्र आक्रोश आहे, हे सरकारला ठाऊक आहे. जर बांधावरच्या लोकांशी बोलायची हिंमतच नव्हती, तर हेलिकॉप्टरमधून खाली उतरायची गरजच काय होती?”
कर्नाटकने विशेष अधिवेशन बोलावले, मग महाराष्ट्राला कशाची भीती?
दुष्काळावर तोडगा काढण्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन घेण्याची मागणी करताना त्यांनी कर्नाटकचा दाखला दिला. “सध्याचे सत्ताधारी काँग्रेसवर सतत टीका करत असतात; परंतु कर्नाटक सरकारने दुष्काळ जाहीर करत तात्काळ विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावले. तिथे आधी १३० आणि नंतर १७७ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला. अधिवेशनामुळे स्थानिक आमदारांना आपापल्या भागातील प्रश्न, पाणीटंचाई, चारा छावण्या यावर सविस्तर चर्चा करता येते.”
विशेष अधिवेशनाची लेखी मागणी
“महाराष्ट्रात दुष्काळाची भीषणता प्रचंड असताना सरकार लोकप्रतिनिधींना सामोरे जायला का घाबरत आहे? आम्ही राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना लेखी पत्र देऊन किमान चार ते पाच दिवसांचे विशेष अधिवेशन तातडीने बोलावण्याची मागणी केली आहे.”
मुंबईतील 14 फुटांवरील झोपड्यांवर कारवाईवर
मुंबईतील 14 फुटांवरील झोपड्यांवर निष्कासन कारवाईच्या मुद्द्यावरून भाजप आमदार अमित साटम यांनी आदित्य ठाकरेंवर ‘झोपेचे सोंग घेतल्याची’ टीका केली होती. त्यावर पलटवार करताना दानवे म्हणाले, “जेव्हा मुंबईत ही 14 फुटांची घरे किंवा 1+1 बांधकामे उभी राहत होती, तेव्हा महापालिकेचे अधिकारी झोपले होते का? हे सर्व प्रशासनाच्या आशीर्वादानेच झाले आहे. आज महागाई आणि जागेच्या टंचाईमुळे गरीब कुटुंबे कशीबशी आसरा शोधून राहत आहेत. अशा वेळी त्यांचे डोक्यावरचे छत हिसकावून घेणे पूर्णपणे अमानुष आहे.”
विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत भाष्य
कसबा किंवा अन्य मतदारसंघातून निवडणूक लढवण्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर अंबादास दानवे यांनी पक्षादेश शिरसावंद्य मानणार असल्याचे सांगितले. “मी या महाराष्ट्राचा सुपुत्र आहे. पक्षाने आदेश दिला आणि सांगितले तर मी राज्यातील कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढवायला तयार आहे; माझ्यासाठी पक्ष आणि पक्षादेश सर्वोच्च आहे,” असा पुनरुच्चार त्यांनी केला.
————————-
हेही वाचा…
ट्रिगर-1चे कागदी घोडे नको, रब्बीसाठी तातडीने रोख मदत द्या!: दुष्काळ जाहीर होताच राजू शेट्टी म्हणाले- गेल्या वर्षी 31 हजार कोटींच्या पॅकेजमधून फुटकी दमडी मिळाली नाही

राज्य सरकारने महाराष्ट्रातील 265 तालुक्यांमध्ये (सुमारे 75 टक्के भागात) ‘ट्रिगर-1’ अंतर्गत कोरडा दुष्काळ जाहीर केला असला, तरी या केवळ कागदी घोषणांनी शेतकऱ्यांचे अश्रू पुसले जाणार नाहीत, अशी रोखठोक प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली आहे. “गेल्या वर्षीही मुख्यमंत्र्यांनी 31 हजार कोटींचे भव्य पॅकेज जाहीर केले होते, पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पदरात फुटकी दमडीही पडली नाही. यंदाच्या दुष्काळात तरी त्या जुन्या अनुभवाची पुनरावृत्ती होऊ नये,” अशी भीती व्यक्त करत, बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या पावसामुळे रब्बी हंगाम तरी वाचवायचा असेल तर शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक आधार द्यावा, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी