Headlines

Murti Daan Record Broken in 2026


अभिनेते अभिजित खांडकेकर यांनी ‘देव द्या, देवपण घ्या’ उपक्रमात सहभागी होत आपल्या घरची गणेशमूर्ती कार्यकर्त्यांकडे सुपूर्द केली.

गोदावरी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी नाशिककरांनी यंदा गणेश विसर्जनाच्या वेळी पर्यावरणपूरक भूमिकेतून ‘देव द्या, देवपण घ्या’ या उपक्रमाला उत्स्फूर्त आणि अभूतपूर्व प्रतिसाद दिला आहे. या उपक्रमांतर्गत यंदा मूर्तीदानाचे सर्व जुने विक्रम मोडीत निघाले असल्याची

.

16 वर्षांपूर्वी लावलेल्या रोपट्याचा महाराष्ट्रभर वटवृक्ष

गोदावरी नदीला प्रदूषणापासून वाचवण्यासाठी 16 वर्षांपूर्वी मूर्ती व निर्माल्य दान करण्यासाठीचा ‘देव द्या, देवपण घ्या’ हा उपक्रम सुरू करण्यात आला होता. या उपक्रमाच्या माध्यमातून प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या (POP) लाखो मूर्तींचे दान नाशिककरांकडून करण्यात येत आहे. 16 वर्षांपूर्वी लावलेले हे छोटेसे रोपटे आता फोफावले असून अवघ्या महाराष्ट्रात त्याचे अनुकरण केले जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

गणेशभक्तांसाठी सोयी-सुविधा

गणेश विसर्जनाच्या दिवशी चोपडा लॉन्सजवळील गोदापार्क येथे सकाळी 8 वाजेपासून या उपक्रमाचे कार्यकर्ते मूर्ती स्वीकारण्यासाठी उपस्थित होते. यावेळी गणेशभक्तांना आदरपूर्वक आणि भावपूर्ण वातावरणात आरती करण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. पिवळ्या रंगाचे आकर्षक कुर्ते परिधान केलेले कार्यकर्ते सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. यंदा 1.5 (दीड), 5 आणि 7 दिवसांच्या घरगुती गणेशोत्सवातील मूर्ती देखील मोठ्या संख्येने स्वीकारण्यात आल्या. लहान मुलांपासून ते वयोवृद्ध नागरिकांपर्यंत सर्वांनीच अत्यंत भावूक वातावरणात मूर्तींचे दान केले.

10 दिवस घराघरांत प्रभावी जनजागृती

प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती, रासायनिक रंगकाम आणि निर्माल्यामुळे गोदावरी नदीचे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी ‘सुविचार मंच’च्या कार्यकर्त्यांनी गणेशोत्सवातील 10 दिवस घराघरांत जाऊन जनजागृती करणारी पत्रके वाटली होती. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातूनही प्रभावी आवाहन करण्यात आले होते. नाशिकच्या लाखो गोदाप्रेमी भाविकांनी या आवाहनाला भरभरून पाठिंबा दिला.

उपक्रम यशस्वी करण्यासाठी आकाश पगार, विशाल गांगुर्डे, राहुल मकवाना, जयश्री नंदवाणी, सोनू जाधव, भाग्यश्री जाधव, योगेश निमसे, दुर्गा गुप्ता, रोहित कळमकर, कल्याणी पाटील, अविनाश बरबडे, श्रावणी निकम, शुभम पगार, प्रियांका पवार आदी स्वयंसेवकांनी अथक परिश्रम घेतले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *