![]()
मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्यावर त्यांच्याच आंदोलनात सक्रिय असलेल्या ललिता तारख या महिलेने गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्याच सहकारी राहिलेल्या महिलेने जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केल्यामुळे मोठी खळबळ उडाली असून, या आरोपांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. मनोज जरांगे यांच्यावर आरोप करताना ललिता तारख म्हणाल्या, मनोज जरांगे यांनी आमच्या गावाला खोटे आश्वासन देऊन माता माऊल्यांना फसवले. तुमच्या उपोषणाची मी साक्षीदार आहे, तुम्ही कसे उपोषण केले हे मी वेळ आल्यावर सांगेल. जरांगे यांनी भावनिक करून महिलांचा वापर केला. मनोज जरांगे यांचे चौथे उपोषण मी सोडले. रात्रंदिवस आम्ही आंदोलनासाठी झटत होतो. अंतरवाली सराटीमध्ये एक देखील कुणबी सर्टिफिकेट मिळाले नाही, हैदराबाद गॅझेटमधून आम्ही दहा महिन्यांपूर्वी अर्ज केला आहे. जरांगे यांनी आमच्या गावाला खोटे आश्वासन देऊन फसवले, असा आरोप त्यांनी केला आहे. तुम्ही कसे उपोषण केले हे मी वेळ आल्यावर सांगेन पुढे बोलताना ललिता तारख म्हणाल्या, अंतरवाली सराटीमध्ये एकही कुणबी नोंद सापडलेली नाहीये, मनोज जरांगे यांनी हैदराबाद गॅझेटीयरनुसार आरक्षण भेटेल असे आश्वासन आम्हाला दिले होते. यापूर्वी आम्ही मंडप काढू नये म्हणून पोलिसांना विरोध केला होता. उपोषण केल्यावर माणूस दोन दिवस देखील राहू शकत नाही. तुमच्या उपोषणाची मी साक्षीदार आहे, तुम्ही कसे उपोषण केले हे मी वेळ आल्यावर सांगेन, उपोषण स्थळावरून शिव्या देणे योग्य नाही, छत्रपती शिवराय 18 पगड जातींना घेऊन चालणारे होते, जिल्हाधिकाऱ्यांबद्दल जी भाषा वापरली गेली, ती योग्य नव्हती, असेही त्यांनी म्हटले आहे. सरकारला तीन महिन्यांची मुदत दरम्यान, एकीकडे हे आरोप होत असतानाच, दुसरीकडे जरांगे पाटील यांच्या आंदोलनातही मोठे बदल पाहायला मिळत आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा उपोषण सुरू करत त्यांनी मुंबईला जाण्याची घोषणा केली होती. परंतु मुंबईच्या वाटेवर असतानाच त्यांनी आपले उपोषण स्थगित करून मागण्या मान्य करण्यासाठी सरकारला तीन महिन्यांची मुदत दिली आहे. या निर्णयानंतर अंतरवाली सराटी येथील घडामोडींनाही वेग आला असून, तिथल्या ग्रामस्थांनी आणि सरपंचांनी मोठा निर्णय घेत जरांगे पाटील यांच्या उपोषणासाठी उभारलेला मंडप व व्यासपीठ आता हटवले आहे.
Source link
'तुम्ही उपोषण कसे केले, हे वेळ आल्यावर सांगेन':ज्या महिलेच्या हातून उपोषण सोडले त्यांच महिलेचे मनोज जरांगेंवर गंभीर आरोप