![]()
नागपूरमध्ये १ सप्टेंबर रोजी मानकापूरच्या फरस चौकात अपघात करून पसार झालेल्या कारचालकाला २५ दिवसांनी पोलिसांनी अटक केली. अक्षय चिखुटकर कडू (२३, रा. वेलतूर, ता. सावनेर) असे आरोपीचे नाव असून, त्याला २६ सप्टेंबर रोजी वेलतूर येथून ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी २०० ते २४० सीसीटीव्ही फुटेज तपासले. आरोपीने मुख्य रस्ता टाळून गावांमधील आडमार्गांचा वापर केला होता. शोध लागू नये म्हणून त्याने अपघातग्रस्त कारची नंबरप्लेट काढून ती दुरुस्तीसाठी गॅरेजमध्ये टाकली होती. १ सप्टेंबरच्या मध्यरात्री फरस चौकात पांढऱ्या ह्युंदाई कारने दुचाकीला धडक दिली होती. या अपघातात दुचाकीस्वार अमन लालचंद ढोरे (२२) यांचा मृत्यू झाला होता. तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने पोलिसांनी देठेवाडा रंगारी येथील एका ऑटोमोबाईल गॅरेजमधून अपघातग्रस्त पांढऱ्या रंगाची ह्युंदाई व्हर्ना (एमएच-४९-बी-०४०४) जप्त केली.
Source link
नंबरप्लेट काढूनही हिट-अँड-रनचा आरोपी जेरबंद:नागपूरमध्ये 25 दिवसांच्या पाठलागानंतर 240 सीसीटीव्ही फुटेजमुळे पकडला; कार गॅरेजमध्ये लपवली होती