Headlines

नामांतर लढ्यातील शहिदांना अभिवादन:आंबेडकरवादी भीमसैनिकांनी मोठ्या जल्लोषात साजरा केला 'स्वाभिमानी विजय दिवस'




आंबेडकरवादी भिमसैनिकांकडून विद्यापीठ नामांतर लढ्यातील शहीद स्मारकाला अभिवादन करुण स्वाभिमानी विजय दिवस मोठ्या जल्लोशात साजरा करण्यात आला. चार वर्षांपूर्वी विद्यापीठ प्रशासनाकडून सुशोभीकरणाच्या नावे जानिवपूर्वक अनेक शहीद भिमसैनिकांच्या त्याग व बलिदानातून उभ्या असलेल्या ऐतिहासिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कमाणीचे महत्त्व कमी करण्याच्या उद्देश्याने त्यासमोरच प्रति कमान बांधन्यात आली होती, परंतु बांधन्यात आलेली भव्य प्रतीकमान ही काही जागरुक स्वाभिमानी भिमसैनिकांनी अनेक त्रीव आंदोलने करून पाडली होती. प्रती कमाण पाडण्यासाठी लढा उभारणाऱ्या भिमसैनिकांनी या आंदोलना दरम्यान आलेल्या कटु अनुभव सांगितले. प्रती कमानीचे उभे असलेल्या तिन कॉलम पैकी केवळ एकच कॉलम काढत प्रशासनाने काही संघटनांचा पाठींबा मिळवीत या आंदोलनात फुट पाडली व प्रती कमाणीचे उर्वरीत दोन कॉलम काढणार नाही, अशी आडमुठी भूमिका घेतली. परंतु आंबेडकरवादी बहुजन विकास समितीने व काही जागरूक स्वाभिमानी भिमसैनिकांनी हा लढा कशाचीही पर्वा न करता लढा सुरुच ठेवला. तीव्र आंदोलने करीत शेवटी प्रशासनाला नमवीत प्रती कमाणीचे उर्वरीत सर्वच बांधकाम हे जेसीबी मशीन लावून पाडण्यास भाग पाडले व यावेळी एकच आंनदोस्तव भिमसैनिकांनी साजरा केला होता. दरवर्षी या ऐतिहासिक स्वाभिमानी लढ्याची आठवण येथील प्रस्थापित व्यवस्थेला करुण देण्यासाठी हा स्वाभिमानी विजय दिवस साजरा केल्या जाईल हा प्रण उपस्थित भिमसैनिकांनी घेतला. तेव्हा पासून याचदिवशी या अस्मीतेच्या लढ्याची आठवण म्हणून “स्वाभिमानी विजय दिवस” साजरा केला जातो. या घटनेस आज चार वर्ष पूर्ण झाल्याने सर्व पक्षीय आंबेडकरवादी पक्ष संघटना व आंबेडकरवादी बहुजन विकास समितीने आज महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुण अभिवादन करुन विद्यापीठ गेटला शहीद स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करुण अभिवादन करीत पुज्यनिय बौद्ध भिख्खु संघाचे नागसेनबोधी, संघप्रिय थेरो, बोधीधम्मो यांच्या वतीने बौद्ध वंदना घेण्यात आली. यानंतर महापुरुषांच्या व नामांतर शहीद अमर रहें, स्वाभिमानी विजय दिनाचा विजय असो अशा गगनभेदी घोषणा देत भिमसैनिकांनी परीसर दणाणून सोडला. यानंतर भव्य आतिशबाजी करीत नागरीकांना मिठाई वाटप करित स्वाभिमानी विजयी दिवस जल्लोशात साजरा करण्यात आला. यावेळी आंबेडकरवादी बहुजन विकास समितीचे अध्यक्ष दिपक निकाळजे, दौलतराव मोरे, सय्यद तौफीक, अरविंद कांबळे, प्रांतोष वाघमारे, अमित वाहुळ, अरुण शिरसाट, आनंद कस्तुरे, संदेश कांबळे, मुकेश खोतकर, नागेश केदारे, धम्मा धन्वे, सचिन जोगदंड, संजय सातपुते, राहुल गवळी, संतोष चव्हाण, सिध्दोधन मोरे, राहुल वडमारे, सचिन शिंगाडे, नागेश जावळे, प्रा.किशोर सुर्यंवंशी, अमोल दांडगे, सिध्दार्थ जाधव, विकास रोडे, नितीन सुर्यवंशी, लखन सुर्यवंशी, अनामी मोरे, धिरज मोरे, राकेश किर्तिकर, नितेश तांगडे, सुनील बनसोडे, ईसा यासिन, राजकुमार कांबळे, वसंतराज वक्ते, कपिल बनकर, सोनू नरवडे, दादाराव सोनट्टके, त्रिशरण गायकवाड, इद्रीस पठान, निखिल निकाळजे, विशाल कांबळे व आंबेडकरी चळवळीच्या भीमसैनिकांची मोठ्या संखेने उपस्थिति होती.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *