![]()
माहेरहून पैसे आणण्याच्या व हुंड्याच्या कारणावरून एका २१ वर्षीय विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिव्या रोहन शिंदे (वय २१, रा. कुंभार गल्ली, श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर; ह.मु. मारवाडी गल्ली, गंगापूर) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पती रोहन उत्तम शिंदे (२५), सासरे उत्तम भाऊसाहेब शिंदे (४५), सासू लक्ष्मीबाई उत्तम शिंदे (४०) आणि दीर रोहित उत्तम शिंदे (२४, सर्व रा. श्रीरामपूर) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, ९ ऑगस्ट २०२३ पासून आरोपींनी संगनमत करून, तुझ्या वडिलांनी लग्नात हुंडा दिला नाही, दुसऱ्या मुलीशी लग्न केले असते तर हुंडा मिळाला असता, असे म्हणून सतत टोचून बोलण्यास सुरुवात केली. तसेच घरातील काम येत नसल्याचे कारण पुढे करत तिच्या चारित्र्यावर संशय घेतला. त्यानंतर दीराच्या न्यायालयीन जामिनासाठी माहेरहून १ लाख रुपये घेऊन ये, अशी मागणी करत तिला वेळोवेळी मारहाण व शिवीगाळ करण्यात आली. त्यानुसार त्यांनी फिर्याद दिली. मुलीला ताब्यामध्ये ठेवून दिली धमकी एवढ्यावरच न थांबता सासरच्या मंडळींनी तुला तुझ्या मुलीला सोबत घेऊन जायचे असेल तर १ लाख रुपये दे, असे म्हणत मुलीला स्वतःच्या ताब्यात ठेवून विवाहितेला जीवे मारण्याची व धमकावण्याची धमकी दिली. या त्रासाला कंटाळून अखेर विवाहितेने गंगापूर पोलिस ठाणे गाठले. या प्रकरणाचा पुढील तपास अंमलदार जाधव करत आहेत.
Source link
हुंड्यासाठी विवाहितेचा छळ:पतीसह चौघांवर गुन्हा दाखल