![]()
पुण्यातील शनिवार पेठेत एका बंद सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी ३० लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरले. ही घटना गणेश विसर्जनाच्या दिवशी घडली. विश्रामबाग पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार त्यांच्या कुटुंबीयांसह शनिवार पेठेतील हसबनीस बखळ येथील एका सोसायटीत राहतात. २५ सप्टेंबर रोजी शुक्रवारी सकाळी ते नातेवाईकांकडे गेले होते. विसर्जनाचा कार्यक्रम आटोपल्यावर ते शनिवारी पहाटे परत आले. परत आल्यावर त्यांना सदनिकेचे कुलूप तुटलेले दिसले. त्यांनी घरात पाहणी केली असता, शयनगृहातील कपाट तोडून चोरट्यांनी ३० लाख रुपयांचे दागिने चोरल्याचे समोर आले. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप आणि सहायक निरीक्षक राजेश उसगावकर यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी सोसायटीतील सीसीटीव्ही फुटेज तपासले असून, पसार झालेल्या चोरांचा शोध सुरू आहे. सहायक पोलीस निरीक्षक साईकुमार कारके या प्रकरणाचा तपास करत आहेत. मिरवणुकीनंतर झालेल्या वादातून तरुणाला मारहाण – गणेश पेठेतील घटना; एकाविरुद्ध गुन्हा दाखल
मिरवणुकीनंतर झालेल्या किरकोळ वादातून तरुणाला भात वाढणीने मारहाण करण्यात आली. भात वाढणी डोक्यात घातल्याने गंभीर जखमी झाला. गणेश पेठेतील बुरुड आळीत ही घटना घडली. या प्रकरणी फरासखाना पोलिसांनी एका विरुद्ध गुन्हा दाखल केला. विनायक घोरपडे असे जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी अक्षय हादगे (वय २५, रा. बुरुड आळी, गणेश पेठ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत अविनाश दत्तात्रय येनपुरे (वय ४५, रा. भाग्यश्री अपार्टमेंट, जीवनधारानगर, धनकवडी) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विसर्जन मिरवणुकीनिमित्त घोरपडे हे त्यांचे मित्र विनायक घोरपडे यांच्याकडे आले होते. बुरूड आळीतील एका मंडळाच्या एका मिरवणुकीत ते सहभागी झाले होते. मिरवणुकीनंतर कार्यकर्त्यांसाठी जेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मध्यरात्री एकच्या सुमारास जेवण सुरू असताना घोरपडे यांनी महिलांना पहिले जेवण द्या, असे सांगितले. या कारणावरुन आरोपीने घोरपडे यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. आरोपीने घोरपडे यांच्या डोक्यात लोखंडी भात वाढणी घातली. घोरपडे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. घोरपडे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पसार झालेल्या आरोपीचा शोध घेण्यात येत असून, पोलीस हवालदार संदीप धनवटे तपास करत आहेत.
Source link
पुण्यात घरफोडी, शनिवार पेठेतील सदनिकेतून 30 लाखांचे दागिने चोरीला:विसर्जनाच्या दिवशी घडली घटना, विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल