Headlines

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह‎:जिल्ह्यात 54 वर्षांत 15 दुष्काळांच्या झळा; 73 वर्षांत 26 वेळा एल निनो




करपलेली पिके, खोल चाललेले भूजल, आटण्याच्या वाटेवरील जलस्रोत आणि समोर रब्बीपासून उन्हाळ्यापर्यंतची धास्ती… जिल्ह्याच्या दारात दुष्काळ यंदा एकटा आलेला नाही; त्याच्यामागे पाणी, चारा, कर्ज आणि पुढच्या हंगामाच्या संकटांची रांग उभी आहे. १९७२ ते २०२६ या ५४ वर्षांचा लेखाजोखा मांडला असता १५ लहान-मोठ्या दुष्काळांनी जिल्ह्याला तडाखा दिल्याचे समोर आले. १९७२ मध्ये धान्यांची वणवण होती. २०१२-१३ मध्ये ४०० हून अधिक टँकर रस्त्यावर उतरले. २०१५-१६ मध्ये पावसात ४१ टक्क्यांपर्यंत तूट नोंदली गेली. यंदा तर हंगाम संपण्याआधीच सप्टेंबरमध्ये नऊही तालुक्यांवर दुष्काळाचे शिक्कामोर्तब झाले. पाच दशकांत धरणे बांधली, प्रकल्प उभे राहिले, सिंचनाची साधने वाढली तरीही अवर्षणाची पकड सुटलेली नाही. २०२६ मध्ये सुरुवातीच्या सरींवर शेतकऱ्यांनी बियाणे, खते, मशागत, मजुरीवर पैसा ओतला. त्यानंतरच्या खंडाने उभ्या पिकांचे गणितच उलटवले. १९७२ चा दुष्काळ भाकरीवर घाव घालत होता; परंतु २०२६ चा दुष्काळ खरीप हातातून निसटला तर त्याची सावली रब्बी, कर्जफेड आणि पुढील उन्हाळ्यापर्यंत जाण्याची भीती आहे. यंदाची परिस्थिती गंभीर आहे. ‘ट्रिगर-१’चे निकष पार झाले आहेत. एकूण पाऊस किती यावरून तीव्रता ठरत नाही, पावसाचा खंड आणि त्या काळातील पिकांची अवस्था निर्णायक ठरते. नऊ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्याचा शासनाचा निर्णय योग्य वेळी झाला आहे. {जमिनीतील ओलावा कमी राहिल्यास हरभरा, गहू आणि ज्वारीच्या क्षेत्रावर परिणाम होण्याची भीती. जलस्रोत खालावल्यास टँकरची मागणी वाढणार आहे . {विहिरी-बोअरवेलची पातळी घसरल्यास ग्रामीण पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर होऊ शकतो. खरीप उत्पादन घटल्याने पशुधनासाठी कडबा-चाऱ्याची उपलब्धता कमी होण्याचा धोका आहे. १९७२ मध्ये जलसाठ्यांची व्यवस्था मर्यादित होती. आता धरणे, मध्यम-लघु प्रकल्प आणि सिंचनाची साधने आहेत तरी पावसाची वेळ चुकली आणि पेरणीनंतर खंड लांबला की उभे पीक वाचवणे कठीण होत असल्याचे यंदाच्या स्थितीने दाखवून दिले. पाच दशकांपूर्वी संकट पोटापर्यंत होते; आता ते शेतकऱ्याच्या अर्थचक्राला विळखा घालत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर नवे संकट आहे. {१९७२-७३ : ४०% पावसाची तूट; अन्नधान्य, पाणी आणि चाऱ्याची वानवा. {१९८५-८७ : तीव्र अवर्षण. १९८५ मध्ये परिस्थितीची पाहणी करण्यास पंतप्रधान राजीव गांधी खुलताबाद तालुक्यात आले होते . {२००१-०३ : भूजल खालावले; वैजापूर, गंगापूरमध्ये खरिपाबरोबर रब्बीलाही फटका. {२०१२-१३ : जलसंकट उग्र; जिल्ह्यात ४०० हून अधिक टँकर. फळबागांवर परिणाम. {२०१४-१६ : २०१५-१६ मध्ये पर्जन्यमानात सुमारे ४१% तूट. {२०१८-१९ : अनेक भागांत खरीप उत्पादनावर परिणाम. {२०२३-२४ : मान्सूनच्या दीर्घ खंडाने पिकास झळ. {२०२६ : सुरुवातीच्या सरींवर पेरण्या; नंतर ओढ. दुष्काळ घोषित. स्त्रोत ः कृषी विभाग उदय देवळणकर, हवामान व कृषितज्ज्ञ, छत्रपती संभाजीनगर ५४ वर्षांमध्ये असा बदलत गेला दुष्काळ दुष्काळाचे संकट गंभीर २०२६ मध्ये अर्थचक्राला फटका



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *