Headlines

इंदूर-पुणे मार्गावर मनमाडमधील रेल्वे उड्डाणपुलावरील फुटपाथची तोडफोड:उर्वरित जागेत फायबर केबल; पादचाऱ्यांना वाहनांच्या मार्गावरून चालण्याची वेळ‎



मनमाड शहरातील रेल्वे उड्डाणपुलावरील पादचाऱ्यांसाठी असलेल्या फुटपाथची मोठ्या प्रमाणावर तोडफोड झाली आहे. उर्वरित जागेत फायबर केबल टाकण्यात आल्याने पादचाऱ्यांना वाहनांच्या मार्गावरून चालावे लागत आहे. त्यामुळे अपघात होण्यापूर्वी प्रशासनाने सुरक्षित व दर्

.

शहरातील रेल्वे उड्डाणपूल हा केवळ वाहनांसाठीच नव्हे, तर दररोज ये-जा करणारे शाळकरी विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि कामगारांसाठीही महत्त्वाचा मार्ग आहे. मात्र, या पुलावरील फुटपाथची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली असून, उर्वरित जागेत फायबर केबल टाकण्यात आल्याने नागरिकांना थेट वाहनांच्या मार्गावरून चालण्याची वेळ आली आहे. त्यामुळे अपघात झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. रेल्वे उड्डाणपुलावर दिवसभर दुचाकी, चारचाकींसह अवजड वाहनांची मोठी वर्दळ असते. त्याचवेळी शहराच्या एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यासाठी अनेक नागरिक पायीही या पुलाचा वापर करतात. अशा ठिकाणी स्वतंत्र आणि सुरक्षित फुटपाथ ही मूलभूत गरज आहे. प्रत्यक्षात मात्र फुटपाथची झालेली पडझड आणि त्यावरून नेण्यात आलेल्या केबलमुळे पादचाऱ्यांना चालण्यासाठी पुरेशी सुरक्षित जागा उरलेली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. वाहनांच्या अगदी जवळून चालताना एखाद्या वाहनाचा किंचित तोल गेला किंवा पादचारी अचानक रस्त्याकडे सरकला, तरी गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषतः शाळकरी मुले आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ही परिस्थिती अधिक धोकादायक ठरू शकते. फुटपाथ हा रस्त्याचा शोभेचा भाग नसून पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठीची आवश्यक सुविधा आहे. त्यामुळे त्याची नियमित देखभाल करणे आणि तो अतिक्रमण अथवा अन्य कामांपासून मोकळा ठेवणे गरजेचे आहे. दरम्यान, संबंधित खाजगी मोबाईल कंपनीला फुटपाथच्या भागातून फायबर केबल टाकण्यासाठी परवानगी कोणी आणि कोणत्या अटींवर दिली, याबाबतही नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

संबंधित प्रशासनाने तातडीने पाहणी करून पादचाऱ्यांसाठी सुरक्षित आणि दर्जेदार फुटपाथ पूर्ववत करण्याची मागणी केली आहे. दुर्लक्ष कायम राहिल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र जनआंदोलन करण्यात येईल. – विलास आहिरे, मनमाड शहराध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *