Headlines

चांदवडला 250 गणेशमूर्तींचे संकलन; कृत्रिम तलावात पर्यावरणपूरक विसर्जन:गणेश विसर्जनासाठी 3 तलावांवर सुरक्षा व्यवस्था; 40 स्वयंसेवक तैनात‎


.

पर्यावरणपूरक विसर्जनासाठी चांदवड नगरपरिषदेच्या मूर्तीदान उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. नगरपरिषद कार्यालयाजवळ व बाजारतळ येथे उभारलेल्या संकलन केंद्रांवर २५० हून अधिक गणेशमूर्ती जमा झाल्या. प्रशासनाने त्यांचे विधिवत विसर्जन केले. दरम्यान, शहरातील ३० गणेश मंडळांसह घरगुती गणेशमूर्तींचे रंगारी, खोकड व राहुड तलावांवर उत्साहात विसर्जन करण्यात आले.

नगरपरिषद हद्दीत लहान-मोठ्या अशा ३० गणेश मंडळांनी श्रीगणेशाची स्थापना केली होती. मंडळांनी डीजेच्या निनादात मिरवणुका काढून बाप्पाला निरोप दिला. घरगुती मूर्तींच्या विसर्जनासाठी रंगारी तलावावर गर्दी झाली. ६ फुटांपेक्षा कमी उंचीच्या मूर्तींसाठी रंगारी, तर त्यापेक्षा अधिक उंचीच्या मूर्तींसाठी खोकड व राहुड तलावावर व्यवस्था करण्यात आली होती.

तिन्ही तलावांवर पट्टीचे पोहणारे ४० स्वयंसेवक तरुण तैनात होते. रंगारी तलावावर बॅरेकेटिंग, चार सीसीटीव्ही कॅमेरे, वीज व मोठ्या मूर्तींसाठी क्रेनची व्यवस्था करण्यात आली होती. निर्माल्य संकलनासाठी ठेवलेल्या कलशात दोन ट्रॅक्टरभर निर्माल्य जमा झाले. आरोग्य सेवेसाठी उपजिल्हा रुग्णालयाची रुग्णवाहिका सज्ज होती. सुरक्षित विसर्जनासाठी सूचना फलकही लावण्यात आले होते.पाणी प्रदूषण टाळण्यासाठी नगरपरिषद कार्यालयाजवळ व बाजारतळ येथे कृत्रिम तलाव आणि मूर्ती संकलन केंद्रे उभारण्यात आली.

मुख्याधिकारी दिनेश सिनारे, कार्यालयीन अधीक्षक आदित्य मुरकुटे, स्वच्छता निरीक्षक विजय सोनवणे, नगर अभियंता भालचंद्र क्षीरसागर तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांनी नागरिकांना मूर्तीदानाचे आवाहन केले. त्यातून २५० हून अधिक मूर्ती संकलित झाल्या.

रंगारी तलावावर मनमाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडीत यांनी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेत सूचना केल्या. विसर्जन मिरवणुकांमध्ये तरुणांचा उत्साह दिसून आला. विविध वाद्यवृंदांच्या तालावर गणेशभक्तांनी ठेका धरला. पोलीस निरीक्षक अभिजीत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवला.

प्रतिनिधी | मनमाड ढोल-ताशांचा गजर, डीजेचा दणदणाट, बँड-संबळाच्या तालावर थिरकणारे गणेशभक्त, फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण आणि ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या गगनभेदी घोषणांनी शहर दुमदुमून गेले. शहरातील श्रीगणेश विसर्जन मिरवणुकीची रात्री उशिरा सांगता झाली. वेशीतील श्री नीलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्टच्या वतीने गुलाल आणि डीजेला फाटा देत श्री नीलमणी गणेशाच्या पार्थिव मूर्तीची पुणेरी पद्धतीने पालखी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी युवतींनी व्यसनाविरुद्धचे फलक हातात घेऊन जनजागृती केली. युवक क्रांती गणेश मंडळाच्या वतीनेही श्रीगणेशाची उत्साहात विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. दुपारनंतर मुख्य विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. शहरातील मानाचा आझाद गणेश मंडळाच्या मिरवणुकीला नगराध्यक्ष योगेश पाटील यांच्या हस्ते फीत कापून सुरुवात करण्यात आली. पारंपरिक हलगी व बँडच्या तालावर मिरवणूक काढण्यात आली. आझाद गणेश मंडळापाठोपाठ मुक्तांगण जिमखाना, तेली गल्ली, सराफ बाजार, भारत गणेश मंडळ, अष्टविनायक गणेश मंडळ, फ्रुट मार्केट गणेश मंडळ, मोटार चालक, मालक असोसिएशन, वीर संभाजी गणेश मंडळ, सुभाष रोडचा राजा, कालिका माता, ओम विश्वरूप गणेश मंडळ, जनता राजा गणेश मंडळ, छत्रपती शिवाजी महाराज गणेश मंडळ, बजरंग गणेश मंडळ, रुद्र हनुमान गणेश मंडळ, छत्रपती शिवाजी महाराज नगर गणेश, हुडकोचा गणेश मंडळ, वीर सावरकर नगर गणेश मंडळ यासह शहरातील विविध भागांतील गणेश मंडळांच्या मिरवणुका रस्त्यावरून निघाल्या.२० ते २५ फूट उंचीपर्यंतच्या भव्य गणेशमूर्तींचे क्रेनद्वारे गणेशकुंडात विसर्जन करण्यात येत होते.यावेळी पालिकेच्या वतीने गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचा गणेश प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. नगराध्यक्ष योगेश पाटील व मुख्याधिकारी शेषराव चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली चोख व्यवस्था ठेवण्यात आली होती.पोलिस निरीक्षक विजय करे यांच्या नेतृत्वाखाली बंदोबस्त तैनात होता. मनमाडमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत जनजागृतीपर संदेशाचे फलक घेवून सहभागी झालेले गणेशभक्त.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *