Headlines

MPSC State Service Exam Postponed; Aditya Thackeray Thanks Governor


महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) 3 ऑक्टोबर 2026 पासून होणारी राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2026 आणि महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) मुख्य परीक्षा 2026 या परीक्षाह

.

राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025च्या मूल्यांकनाबाबत विद्यार्थी आणि विविध विद्यार्थी संघटनांकडून आक्षेप नोंदवण्यात आले होते. हे आक्षेप विचारात घेऊन आयोगाने या परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 2025च्या परीक्षेची पुढील प्रक्रिया लांबण्याची शक्यता असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

आदित्य ठाकरेंनी राज्यपालांकडे केली होती मागणी

MPSCच्या परीक्षा आणि शासकीय भरती प्रक्रियेतील विविध प्रश्नांबाबत आदित्य ठाकरे यांनी 11 सप्टेंबर 2026 रोजी राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची भेट घेतली होती. या भेटीत परीक्षार्थींच्या समस्या आणि तक्रारी राज्यपालांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या होत्या. यानंतर 25 सप्टेंबर रोजी आदित्य ठाकरे यांनी राज्यपालांना पत्र देऊन परीक्षार्थींच्या मागण्यांबाबत पुन्हा निवेदन केले होते. सध्याच्या परिस्थितीत MPSC च्या कार्यपद्धतीबाबत तसेच आयोगाच्या अध्यक्षांबाबत परीक्षार्थींच्या मनात अविश्वासाचे वातावरण असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले होते.

राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 पुढील महिन्यात होणार असल्याने या परीक्षेबाबत विद्यार्थ्यांकडून अनेक निवेदने प्राप्त झाल्याचेही पत्रात म्हटले होते.

समितीच्या अहवालानंतर परीक्षा घेण्याची मागणी

आदित्य ठाकरे यांनी राज्यपालांकडे परीक्षार्थींच्या वतीने दोन प्रमुख मागण्या मांडल्या होत्या. व्ही. राधा समितीचा अहवाल आल्यानंतर त्याची योग्य अंमलबजावणी होईपर्यंत परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी पहिली मागणी होती. परीक्षा पुढे ढकलल्यामुळे ज्या परीक्षार्थींचे वयाच्या निकषामुळे नुकसान होऊ शकते, त्यांना वयाबाबत सवलत देण्यात यावी, अशी दुसरी मागणी करण्यात आली होती.

विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून या मागण्यांवर गांभीर्याने निर्णय घ्यावा आणि परीक्षार्थींचा आयोगाच्या कार्यपद्धतीवरील विश्वास कायम राहण्यासाठी योग्य पावले उचलावीत, अशी विनंती आदित्य ठाकरे यांनी राज्यपालांकडे केली होती.

परीक्षा पद्धतीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय समिती

दरम्यान, राज्यातील सध्याच्या परीक्षा पद्धतींचा आढावा घेण्यासाठी राज्य सरकारने उच्चस्तरीय समिती गठित केली आहे. या समितीने राज्यभरातील अनेक परीक्षार्थी आणि संबंधित घटकांशी चर्चा केली आहे. तसेच विविध ठिकाणी वापरल्या जाणाऱ्या चांगल्या परीक्षा पद्धतींचा अभ्यास करून आदर्श परीक्षा पद्धतीबाबत शिफारसी तयार करण्याचे काम केले आहे.

या समितीच्या शिफारसी लवकरच अपेक्षित असल्याचे MPSCने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

विद्यार्थी, पालक आणि संघटनांकडून परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी

या पार्श्वभूमीवर अनेक विद्यार्थी, पालक, विद्यार्थी संघटना तसेच काही लोकप्रतिनिधींनी 3 ऑक्टोबर 2026पासून सुरू होणारी राज्यसेवा मुख्य परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी केली होती. याबाबतची निवेदने आयोगाला प्राप्त झाली होती.

या सर्व बाबींचा विचार केल्यानंतर आयोगाने राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. त्यासोबत महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2026 आणि महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) मुख्य परीक्षा 2026 याही पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

MPSCने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे आभार मानले. परीक्षार्थींच्या मागण्यांची दखल घेत राज्यसेवा मुख्य परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे त्यांनी म्हटले. तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या प्रमुखांचा राजीनामाही तात्काळ घेतला जाईल, अशी आशा व्यक्त केली आहे.

आता आयोगाकडून तीनही परीक्षांच्या सुधारित तारखा कधी जाहीर होतात आणि राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 च्या पुनर्मूल्यांकनानंतर पुढील प्रक्रिया कशी केली जाते, याकडे परीक्षार्थींचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा….

MPSC च्या 3 महत्त्वाच्या परीक्षा पुढे ढकलल्या:राज्यसेवा मुख्य परीक्षेची 3 ऑक्टोबरची परीक्षा स्थगित, नवीन तारखा लवकरच

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) ऑक्टोबरमध्ये नियोजित असलेल्या तीन महत्त्वाच्या मुख्य परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026, महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) मुख्य परीक्षा 2026 आणि महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2026 यांचा समावेश आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा 3 ऑक्टोबर 2026 पासून सुरू होणार होती. आयोगाच्या निर्णयामुळे या परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला असला, तरी सुधारित वेळापत्रकाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.