Headlines

शेतकरी हिताला प्राधान्य- चेअरमन भुमरे:रेणुकादेवी शरद कारखान्याच्या 25 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची उत्साहात सांगता‎




श्री रेणुकादेवी शरद सहकारी साखर कारखाना लि., रेणुका नगरच्या २५ व्या अधिमंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभा दि.२७ सप्टेंबर रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. यावेळी कारखान्याचे चेअरमन विलास संदीपान भुमरे यांनी शेतकरी हिताला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी कारखान्याच्या मागील वाटचालीचा आढावा घेताना चेअरमन विलास भुमरे यांनी कारखान्याच्या अडचणीच्या काळात सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, संचालक मंडळ, अधिकारी-कर्मचारी व कामगारांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. सन २०२५–२६ च्या गाळप हंगामात कारखान्याने १ नोव्हेंबर २०२५ रोजी गाळप सुरू करून २२ मार्च २०२६ रोजी हंगामाची सांगता केली. या कालावधीत २,०५,४६६.०३९ मे. टन उसाचे गाळप करण्यात आले, अशी माहिती त्यांनी दिली. आगामी काळात कारखान्याची गाळप क्षमता वाढवण्यावर विशेष भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी त्यांनी सांगितले. कारखान्याच्या प्रत्येक निर्णयाच्या केंद्रस्थानी ऊस उत्पादक शेतकरी असला पाहिजे. शेतकऱ्याला वेळेवर ऊस तोडणी, वाहतूक व गाळपाची सुविधा मिळणे, तसेच आर्थिक शिस्त व पारदर्शक कारभार राखणे, हे उद्दिष्ट असल्याचेही आमदार तथा चेअरमन विलास भुमरे यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी नंदु पठाडे, व्हाइस चेअरमन राजू भुमरे, रवींद्र काळे, नितीन तांबे, अप्पासाहेब निर्मळ, विलास गोरे, किशोर चौधरी, प्रदीप नरके, शरद नरके यांच्यासह संचालक मंडळातील सदस्य लक्ष्मण डांगेसह सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, अधिकारी, कर्मचारी व कामगार हजर होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *