![]()
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) ३ मुख्य परीक्षा स्थगित केल्या आहेत. नव्या तारखा नंतर जाहीर केल्या जातील. ड्रग इन्स्पेक्टर परीक्षेतील कथित पेपरफुटी आणि आयोगाच्या परीक्षा पद्धतीवरून उमेदवारांनी केलेल्या विरोधानंतर हा निर्णय घेण्यात आला. राज्यसेवा २०२६ ची मुख्य परीक्षा ३ ऑक्टोबरपासून सुरू होणार होती. मात्र विद्यार्थी, पालक, संघटना आणि काही लोकप्रतिनिधींनी ती पुढे ढकलण्याची मागणी केली होती. आयोगाने राज्यसेवा मुख्य परीक्षा-२०२५ च्या उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करण्याचाही निर्णय घेतला आहे. उमेदवारांनी मूल्यांकनावर आक्षेप घेतले होते. परीक्षा पद्धतीचा आढावा घेणारी व्ही. राधा समिती लवकरच आपल्या शिफारशी सादर करेल. याशिवाय आयोगाने महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा-२०२६ देखील स्थगित केली असून गट-ब (अराजपत्रित) मुख्य परीक्षाही पुढे ढकलण्यात आली आहे.
Source link
एमपीएससीने राज्यसेवा मुख्यपरीक्षेसह 3 परीक्षा पुढे ढकलल्या:2025 च्या उत्तरपत्रिकांची पुन्हा तपासणी करणार