Headlines

पथनाट्य, रॅली अन् व्याख्यानातून व्यसनमुक्तीचा संदेश:अमली पदार्थांच्या तस्करी व सेवनाविरोधात नेहमीच सजग राहा- महापालिका आयुक्त डांगे‎




केंद्रीय संचार ब्युरो (भारत सरकार) अहिल्यानगर महानगरपालिका आणि हरियाली संस्था, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘नशा मुक्त भारत’ अमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियानाला विद्यार्थ्यांचा आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शासकीय तंत्रनिकेतन येथे आयोजित या कार्यक्रमात व्याख्यान, लघु प्रदर्शन, रॅली आणि पथनाट्याद्वारे ‘व्यसन सोडा, जीवन जोडा’ हा संदेश अत्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच त्यांच्या हस्ते प्रदर्शनाचेही उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी युवकांना व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन केले. डांगे म्हणाले, तरुण पिढीला अंमली पदार्थांच्या विळख्यातून वाचवण्यासाठी अशा सामाजिक मोहिमांची अत्यंत गरज असल्याचे प्रतिपादन केले. तसेच त्यांनी व्यसनाधीनतेचे सामाजिक व कायदेशीर दुष्परिणाम अधोरेखित केले. अमली पदार्थांच्या तस्करी आणि सेवना विरोधात शासनाने घेतलेल्या भूमिकेची माहिती देत त्यांनी विद्यार्थ्यांना सजग राहण्याचे आवाहन केले. जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाचे तज्ञ सल्लागार रवींद्र ठाणगे यांनी व्यसनापासून होणारे अतिगंभीर परिणामांची जाणीव उपस्थिती युवकांना करून दिली. पीपीटी, व्हिडिओद्वारे त्यांनी वेगवेगळी उदाहरणे युवकांसमोर सादर केली. व्यसनांपासून आयुष्यभर दूर राहून आनंददायी, आरोग्यदायी जीवन जगण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. अजय आगरकर यांनी संस्थेच्यावतीने अशा राष्ट्र उभारणीच्या कार्यात विद्यार्थी नेहमीच आघाडीवर राहतील अशी ग्वाही दिली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला केंद्रीय संचार ब्युरोचे पी. फणिकुमार आणि हरियाली संस्थेचे सुरेश खामकर यांनी प्रास्ताविकात उपक्रमाची पार्श्वभूमी मांडली. कार्यक्रमास तंत्रनिकेतनचे प्रबंधक मनोहर चौधरी, प्रताप शेटे, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. पथनाट्य अन् जनजागृती र’लीतून प्रभावी संदेश महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘व्यसनमुक्ती पथनाट्याला’ उपस्थितांची दाद मिळाली. नशामुक्त भारताच्या घोषणा देत विद्यार्थ्यांनी काढलेली ‘जनजागृती रॅली’ हे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले. रील व पोस्टर मेकिंग स्पर्धेसह विविध स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक व प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. या रॅलीच्या माध्यमातून सारसनगर, चाणक्य चौक, बुरुडगाव रोड या परिसरात व्यसनमुक्ती आणि स्वच्छता ही सेवा याबाबत व्यापक जनजागृती केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *