Headlines

श्रीरामपुरात दुष्काळाची नांदी, खरीप संकटात पाण्याअभावी पिके करपली:चाऱ्यासाठी उसाची तोड वेगात, कारखान्याला जाणवणार ऊस टंचाई‎



खरीप तर हातचे गेले आता रब्बी तरी हातात येईल अशा अपेक्षेसह शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाची पूर्वतयारी सुरू करण्यात आली आहे. यावर्षी तालुक्यातील अनेक भागात पावसाने पाठ फिरवली असल्याने खरीप पिकांसह चारा पिकेही धोक्यात आली आहेत. अनेक भागात वन्य प्राण्यांचा उच

.

पाण्याअभावी चारा टंचाई जाणवू लागली आहे. पाऊस झाला नाहीच तर उन्हाळ्यात तीव्र पाणी आणि चारा टंचाई जाणवणार आहे. चारा टंचाईवर सध्या उसाचा दिलासा मिळत आहे. पाण्याअभावी ऊस पिकेही संकटात सापडली असल्याने चाऱ्यासाठी सरसकट उसाची पिके तोडली जात आहेत. असे झाले तर तालुक्यात एकमेव सुरू असलेल्या अशोक कारखान्यासाठी उसाची तीव्र टंचाई जाणवणार आहे. तालुक्यातील अनेक भागातील सोयाबीन, कपाशीसह ऊस वाळून गेला आहे. यावर्षी दुष्काळाचे भयंकर संकट घोंगावत असल्याने शेतकऱ्यांनी खर्चाचा हात आखडता घेतला आहे. मुलांच्या शिक्षणासह लग्नकार्य, दवाखाना यांसह दैनंदिन घरखर्च कसा भागवायचा असा प्रश्न अनेकांना पडला आहे. सोयाबीन वाळून गेले आहेत. काही ठिकाणी शेंगा आहेत मात्र दाणे भरलेले नाहीत.

दरम्यान, सध्या शेती पिकासाठी पाटपाण्याचे आवर्तन सोडण्यात आलेले आहे. मात्र सोयाबीन सारख्या पिकांचे वय होऊन गेल्याने या पिकाला आवर्तनाचा फायदा होणार नाही. तालुक्यातील सोयाबीनच्या उत्पन्नात घट होणार आहे. ऊस पिकांसह चारा पिकाला मात्र आवर्तनाचा फायदा होणार आहे. या आवर्तनातून गावतळे आणि तालुक्यातील सर्व बंधारे व इतर तलाव भरून घ्यावेत अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

तालुक्यात सरासरीच्या ३७ टक्केच पाऊस तालुक्यात सरासरी ३२७ मिमी पाऊस पडतो मात्र प्रत्यक्षात आज अखेर १६६.५ मिमी पाऊस झाला आहे. तालुक्यात आतापर्यंत श्रीरामपूर मंडळात २२३.३ मिमी म्हणजे ४८.७ टक्के, बेलापूर मंडळात १६९ मिमी- ३७.६ टक्के, उंदीरगाव मंडळात १६६.५ मिमी-३७ टक्के टाकळीभान मंडळात १३८.९ मिमी- ३०.९ टक्के, कारेगाव मंडळात १३३.२ मिमी-२९.६ टक्के असा तालुक्यात एकूण सरासरी फक्त १६६.५ मिमी म्हणजे ३७ टक्केच पाऊस पडल्याची नोंद आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *