Headlines

निवडणूक आयुक्तांच्या विरोधात काँग्रेसचा मोर्चा:वातावरण तापले, ग्रामीण व शहर दोन्ही काँग्रेस कमिटींचा मोर्चात सहभाग




अमरावती मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेतून मतदारांची नावे वगळली जात असल्याचा आरोप करीत, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना बडतर्फ करून अटक करावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. यासाठी सोमवारी, येथील जिल्हाकचेरीवर ग्रामीण व शहर काँग्रेसने धरणे दिले. खासदार बळवंतराव वानखडे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. निवडणूक आयोगाने स्वतंत्र व निष्पक्षपणे निवडणुका पार पाडणे अपेक्षित आहे. मात्र, एसआयआरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मतदारांची नावे वगळली जात असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. निवडणूक आयोगातील दोन आयुक्तांनी मुख्य निवडणूक आयुक्तांच्या काही निर्णयांवर आक्षेप घेतल्याचा संदर्भही काँग्रेसच्या निवेदनात देण्यात आला आहे. काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप केले आहेत. लोकशाही व घटनात्मक मूल्यांचे रक्षण करण्यासाठी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. निवेदनात महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४, बिहार, पश्चिम बंगालमधील मतदार यादीच्या प्रक्रियेबाबतही विविध आरोप करण्यात आले आहेत. आंदोलनात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, माजी मंत्री यशोमती ठाकुर, डॉ. सुनील देशमुख, शहराध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, प्रदेश प्रवक्ते ॲड. दिलीप एडतकर, मिलिंद चिमोटे, माजी आमदार प्रा. वीरेंद्रभाऊ जगताप, राजकुमार पटेल, हरिभाऊ मोहोड, कांचनमाला गावंडे, जयंतराव देशमुख, मुकद्दर खा पठाण, प्रदीप देशमुख, राहुल येवले, रामेश्वर अभ्यंकर, रजनीताई बेलसरे, प्रमोद दाळू, सुरेश साबळे, रमेश सावळे, प्रवीण मनोहर, डॉ. रवींद्र वाघमारे, पंकज वानखडे, सुनील गावंडे, अमोल होले, श्रीनिवास सूर्यवंशी, प्रदीप देशमुख, हरीश मोरे, गजानन देशमुख, प्रकाश काळे, गजानन पाथरे, मुरलीधर नाईक, महेंद्र गैलवार, दीपक सवई, वैभव वानखडे, श्रीकांत झोडपे, प्रमोद कांबळे आदी सहभागी झाले होते. जिल्हा ग्रामीण काँग्रेसच्या पूर्वी शहर काँग्रेसनेही जिल्हाकचेरीवर याच मुद्द्यावर आंदोलन केले. यावेळी त्यांनी निवडणूक आयुक्तांमधील मतभेदांकडे उपस्थितांचे लक्ष वेधले. गेल्या १० महिन्यांत १४ वेळा तक्रारी नोंदवून दोन निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीरसिंह संधू, डॉ. विवेक जोशी यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या विरोधातील मुद्दे स्पष्ट केले. लोकशाहीच्या दृष्टीने ही चिंताजनक बाब असल्याचे काँग्रेसने यावेळी नमूद केले. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी “वोट चोरी त्वरित थांबवा”, “ज्ञानेश कुमार राजीनामा द्या”, “ज्ञानेश कुमार यांच्यावर कारवाई करा”, “वोट चोर गद्दी छोड” अशा घोषणा दिल्या. आंदोलनात शहराध्यक्ष बबलू शेखावत यांच्यासह प्रदेश उपाध्यक्ष भैय्या पवार, महिला काँग्रेस अध्यक्ष जयश्री वानखडे, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष निलेश गुहे, युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष वैभव देशमुख, माजी महापौर अशोक डोंगरे, विनोद मोदी, राजेंद्र वर्मा, विजय वानखडे, अभिनंदन पेंढारी, डॉ. सुजाता झाडे आदी पदाधिकारी तसेच कार्यकर्ते सहभागी झाले होते. शहर काँग्रेसने उघड केला अंतर्गत मतभेदांचा मुद्दा; पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *