Headlines

आंदोलन:राष्ट्रसंतांना भारतरत्न सन्मान द्यावा, गुरुदेवभक्तांचे कलेक्ट्रेटवर धरणे, संत गाडगे महाराज यांच्या समाधीस्थळापासून मोर्चाला सुरुवात‎




“या भारतात बंधुभाव नित्य वसू दे…’ असा खंजिरीच्या तालावर विश्वाला मानवतेचा आणि ग्रामविकासाचा संदेश देणारे युगपुरुष, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना ‘भारतरत्न’ हा देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान बहाल करण्यात यावा, या मागणीसाठी आज, सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. जिल्हाभरातील अनेक गुरुदेवभक्तांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुतळा समितीच्या पुढाकाराने त्यासाठी शहरात महारॅली काढण्यात आली. संत गाडगे महाराज यांच्या समाधीस्थळापासून सुरुवात होऊन ही महारॅली जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचली. त्यानंतर त्याच ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनाच्या शेवटच्या टप्प्यात जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांना राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्या नावे लिहलेले निवेदन सादर करण्यात आले. स्वातंत्र्यलढ्यात आपल्या भजनांच्या ललकारीने क्रांतीची मशाल पेटवणारे आणि स्वातंत्र्योत्तर काळात ग्रामसुधारणेची गंगोत्री घराघरांत पोहोचवणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे, तर संपूर्ण राष्ट्राचे आराध्य दैवत आहे. त्यामुळे त्यांना मरणोत्तर हा पुरस्कार दिलाच पाहिजे, अशी आग्रही मांडणी यावेळी करण्यात आली. ग्रामगीताचार्य मनोहराव साबळे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. राष्ट्रसंत ही सर्वात मोठी उपाधी असली तरी भारतरत्न मिळाल्यास त्यांचा फोटो हा राजशिष्टाचारानुसार प्रत्येक सरकारी कार्यालयातील तसबीरींमध्ये समाविष्ट होणार आहे. त्यामुळे तो सन्मान राष्ट्रसंतांना मिळालाच पाहिजे, अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडण्यात आली. आंदोलनात प्रा. प्रकाशराव बोके, प्रा. मनोज भिष्णूरकर, गणेशराव जगताप, प्रशांत कांबळे, शफिक शहा, भास्करराव भटकर, इंजी. पवन दवंडे, बाबूराव धोटे, मनोज दिगांबरे, काळे महाराज, राजेश घोराड, मुकुंद पुणसे, विलास साबळे, शारदा फुके, वैशाली ठाकरे, प्रगती तिडके, सुनील देशमुख, अरुण तडस आदी गुरुदेवभक्त सहभागी झाले होते. २१ पासून पुन्हा मोझरीत आंदोलन सुरु होणार याच मागणीसाठी आगामी २१ ऑक्टोंबरपासून गुरुकुंज मोझरी येथील समाधीस्थळ परिसरात जनआंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. यापूर्वी ९ ऑगस्ट या क्रांतीदिनी तिवसा तहसील कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलनही करण्यात आले होते. दरम्यान आता हे लोण संपूर्ण राज्यभर पसरत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *