Headlines

Narhari Zirwal Statement; Tribal Protest In Nashik & Central Kitchen Issue


आंदोलन करायचे आणि काही झाले की राजीनामा मागणे कितपत योग्य आहे? आदिवासी मंत्री नेहमीच सकारात्मक गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असतात. अशा वेळी आदिवासी बांधवांनी आंदोलन करून मंत्र्यांचा राजीनामा मागणे योग्य नाही. मुख्यमंत्री दोन- 4 दिवसांत नाशिकमध्ये येत

.

मंत्री नरहरी झिरवाळ म्हणाले की, अन्न 120 ते 130 किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर खाण्यायोग्य राहत नाही, त्यामुळे ‘सेंट्रल किचन’ बंद करण्यात यावे, असे आम्हा सर्व आमदारांचे मत आहे. नाशिकमध्ये आंदोलन करणारे विद्यार्थी नेत्यांपेक्षा अधिक शिकलेले आहेत आणि त्यांना प्रत्येक गोष्ट समजते. केंद्रीय भोजन पद्धत बंद करावी, गडचिरोलीतील सर्पदंश झालेल्या विद्यार्थिनींच्या पालकांना एक कोटी रुपयांची मदत द्यावी, आदिवासी विकास मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, यासह इतर मागण्यांसाठी सकल आदिवासी विद्यार्थी आंदोलन कृती समितीच्या वतीने सोमवारी नाशिक ते मुंबई अशा मोर्चाला सुरुवात झाली. या मागण्यांच्या पार्श्वभूमीवर मंत्री नरहरी झिरवाळ यांनी घेतलेली भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणारी आहे.

मागण्या एक असताना आंदोलन का?

मंत्री नरहरी झिरवाळ म्हणाले की, महाराष्ट्रात आदिवासी समुदायाचे 25 आमदार आहेत. मी आणि आदिवासी विकास मंत्री दोघेही आदिवासी असून, आम्ही सर्वजण आदिवासी समाजाचे प्रश्न सातत्याने मांडत असतो. शैक्षणिक प्रश्न असोत, जिल्हा परिषदेचे प्रश्न असोत किंवा इतर योजनांशी संबंधित प्रश्न असोत, सर्व आदिवासी आमदार एकत्र येऊन ते सरकारसमोर मांडतात. संपूर्ण महाराष्ट्रभर आदिवासी बांधवांनी एकाच वेळी आंदोलन सुरू केले होते; मात्र राज्यभरातील इतर ठिकाणचे आंदोलन संपले असताना नाशिकचे आंदोलन अद्याप का संपले नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला, कारण सर्व ठिकाणचा मुद्दा एकच होता.

सेंट्रल किचन’ तातडीने कसे बंद करणार?

मंत्री नरहरी झिरवाळ म्हणाले की, पुढील तीन महिन्यांत सर्व विषय मार्गी लावू, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. आदिवासी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी फारसा वेळ लागू नये हे योग्य असले तरी सर्वच बाबी एकाच वेळी पूर्ण होऊ शकत नाहीत. ‘सेंट्रल किचन’ बंद करावे, ही महाराष्ट्रातील सर्वच आमदारांची मागणी असून सरकारने ती मान्यही केली आहे. मात्र, ही प्रक्रिया तातडीने पूर्ण होऊ शकत नाही. अवघ्या आठ दिवसांत संपूर्ण यंत्रणा नव्याने सुरू करायची झाल्यास, आवश्यक यंत्रसामग्रीशिवाय आश्रमशाळांमध्ये किचन व्यवस्था कशी सुरू होणार, असा सवालही त्यांनी केला.

हे ही वृत्त वाचा

आंदोलनाची धग दिल्लीपर्यंत पोहोचणार:राज ठाकरे-राहुल गांधींमध्ये संवाद, ठाकरे बंधूंचा मोर्चा हुकूमशाहीविरुद्ध!; संजय राऊतांचा केंद्र सरकारवर चौफेर हल्ला

“केंद्रीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून लोकशाहीची गळचेपी करणाऱ्या मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात देशभरात आक्रोशाचा भडका उडणार आहे. ठाकरे बंधूंनी एकत्र येत 4 ऑक्टोबरला पुकारलेल्या जनमोर्चाची धग दिल्लीपर्यंत पोहोचेल आणि सरकारला ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घ्यावाच लागेल. राज ठाकरे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यामध्येही थेट संवाद सुरू असून, विरोधी पक्षांची ही एकजूट देशाच्या संविधानाच्या रक्षणासाठी आहे,” असा मोठा खुलासा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.