Headlines

कुंती माझ्या आयुष्याचा मुख्य कणा:रोहित पवारांच्या पत्नीला हटके शुभेच्छा, म्हणाले-माझ्या कर्तव्याला स्वतःचंच कर्तव्य मानणारी परफेक्ट Better Half!




‘माझ्यासाठी कुंती ही केवळ दुसरं चाक नाही तर माझ्या संपूर्ण आयुष्याचा आणि संघर्षाचा मुख्य कणा आहे. तिच्या साथीमुळंच आमचा कौटुंबिक, सामाजिक, व्यावसायिक आणि राजकीय रथ न अडखळता अविरत सुरुय. ती माझ्या कर्तव्याला स्वतःचंच कर्तव्य मानणारी समजुतदार आणि परफेक्ट Better Half आहे,’ अशा शब्दांमध्ये रोहित पवार यांनी पत्नी कुंती यांना शुभेच्छा दिल्या. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार सध्या MPSC आंदोलन, दुष्काळाच्या दौरा ते अनेक राजकीय पेचप्रसंगात व्यस्त असतात. अशावेळीही आपली पत्नी वाढदिवसासारख्या महत्त्वाच्या दिवशीही आपल्यासोबत कशी असते, याची भावनिक पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली. आपल्या सहचारिणीबद्दल असणारे प्रेम आणि आदर रोहित पवारांनी या पोस्टमधून व्यक्त केलेय. तुम्हीही जरूर वाचा… रोहित पवारांची पोस्ट जशीच्या तशी… रोहित पवार आपल्या पोस्टमध्ये म्हणतात की, ‘पती-पत्नी हे संसाररुपी रथाची दोन चाकं असतात, असं म्हटलं जातं. पण माझ्यासाठी कुंती ही केवळ दुसरं चाक नाही तर माझ्या संपूर्ण आयुष्याचा आणि संघर्षाचा मुख्य कणा आहे. तिच्या साथीमुळंच आमचा कौटुंबिक, सामाजिक, व्यावसायिक आणि राजकीय रथ न अडखळता अविरत सुरुय. योगायोग म्हणजे माझ्यासोबतच आज या दुसऱ्या चाकाचाही अर्थात माझ्या सुख-दुखाःतील भागीदार असलेल्या पत्नी कुंतीचाही वाढदिवस आहे. ती माझ्या पाठीशी किती खंबीरपणे उभी असते, याचा प्रत्यय मला गेल्याच आठवड्यात आला. MPSC च्या विद्यार्थ्यांचं पूर्वनियोजित आंदोलन हे 27 तारखेला होतं, आंदोलन किती दिवस चालेल याचा नेम नव्हता. मनात विचार आला की कुंतीच्या वाढदिवसाच्या दिवशीही आपण रस्त्यावर आंदोलनाला बसलो तर कुंतीला काय वाटेल? याबाबत तिच्याशी बोललो तेंव्हा तिने दिलेलं उत्तर मनाला भिडणारं होतं. ती सहज म्हणाली, ‘‘वाढदिवस तर दरवर्षीच येतो, पण आंदोलनात तुमच्या असण्याने लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य सावरणार असेल, त्यांचं स्वप्न साकार होणार असेल आणि महाराष्ट्राला नवनवीन उंचीवर घेऊन जाणारे स्वच्छ प्रतिमेचे अधिकारी मिळण्यास मदत होणार असेल तर वाढदिवसाच्या दिवशीही तुम्ही आंदोलन केलं तर उलट त्याचा मला आनंदच होईल आणि अभिमानही वाटेल.’’ तिचे हे शब्द ऐकून तिच्याविषयीचा आदर शतपटीने वाढला आणि आमची केमिस्ट्री किती परफेक्ट जुळलीय याचीही पुन्हा प्रचिती आली. आता योगायोगाने आंदोलनच २ ऑक्टोबरपर्यंत पुढं ढकललं त्यामुळं वाढदिवसाच्या दिवशी संपूर्ण कुटुंबालाच वेळ देता येतोय याचा आनंदच आहे. आता माझ्या कर्तव्याला स्वतःचंच कर्तव्य मानणाऱ्या समजुतदार आणि परफेक्ट Better Half ला हृदयपूर्वक Full शुभेच्छा..! तिची भक्कम साथ कायम मिळावी आणि तिला निरामय आरोग्य लाभावं, ही ईश्वरचरणी प्रार्थना..!’



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *