Headlines

विलीनीकरणाचा निर्णय सुनेत्राताई घेतील:सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींसोबत राज ठाकरे युती करणार का?- नवनाथ बन




शरद पवारांनी इंडिया आघाडीत राहायचे की आपले स्वतंत्र अस्तित्व ठेवायचे, हा त्यांचा स्वतःचा निर्णय आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबतचा अंतिम निर्णय सुनेत्राताई पवार घेतील आणि त्या जो निर्णय घेतील , त्याला महायुतीचा पूर्ण पाठिंबा असेल, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. राहुल गांधी आणि राज ठाकरे यांच्यात संवाद वाढल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. यावर बोलताना बन म्हणाले की, जेव्हा राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला होता, तेव्हा राज ठाकरेंनी त्यांचा उल्लेख ‘गुळगुळीत मेंदू असलेला माणूस’ असा केला होता. जर राज ठाकरेंच्या दृष्टीने राहुल गांधींचा मेंदू ‘गुळगुळीत’ असेल, तर त्यांच्याशी संवाद साधण्याची वेळ राज ठाकरेंवर का आली? सावरकरांचा अपमान करणाऱ्यांसोबत ते मांडीला मांडी लावून बसणार का? याचे उत्तर मनसैनिकांना आणि महाराष्ट्रातील जनतेला दिले पाहिजे. राऊतांनी स्वतःचा नगरसेवक शोधावा नवनाथ बन म्हणाले की, मोदीजींची ट्रॅव्हल कंपनी शोधण्याआधी संजय राऊतांनी स्वतःचा एखादा नगरसेवक शोधावा. आमची महाराष्ट्रासह देशातील 22 राज्यांमध्ये सत्ता आहे, तर उबाठा गटाचे महाराष्ट्रात तेवढे आमदारही नाहीत. त्यामुळे आदित्य ठाकरेंनी आधी स्वतःच्या पक्षाची ताकद समजून घ्यावी आणि मग महायुतीला सरकार चालवण्याचे सल्ले द्यावेत, असा टोलाही त्यांनी लगावला. कार्यकर्त्यांकडे लक्ष द्या नवनाथ बन म्हणाले की, मुख्य निवडणूक आयुक्तांना बडतर्फ करण्यापेक्षा महाराष्ट्रातील जनतेने उबाठा गटालाच राजकारणातून बडतर्फ केले आहे. विधानसभा निवडणुकीपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपर्यंत जनतेने त्यांना नाकारले आहे. महाराष्ट्रात निवडणुका झाल्या तेव्हा ज्ञानेशकुमार मुख्य निवडणूक आयुक्त नव्हते, मग त्यांचा या निवडणुकीशी काय संबंध? पक्षाचा पराभव झाल्यानंतर निवडणूक आयोगावर खापर फोडण्यापेक्षा उबाठा गट आणि मनसेने आपल्या कार्यकर्त्यांकडे लक्ष द्यावे, असा सल्ला त्यांनी दिला. ‘तीन तिघाडा, काम बिघाडा’ नवनाथ बन म्हणाले की, इंग्रजांविरुद्ध तो नारा दिला होता, तर महाराष्ट्रातील जनतेने उद्धव ठाकरेंना कायमचे ‘घरी बसवण्यासाठी’ जनादेश दिला आहे. मविआची अवस्था आज ‘तीन तिघाडा, काम बिघाडा’ अशी झाली असून, त्यांना साधे एक आंदोलनही एकत्र येऊन पार पाडता येत नाही. काँग्रेसची वेगळी दिशा, मनसेचा वेगळा रस्ता आणि उबाठाचा वेगळा सूर अशी यांची अवस्था असून, त्यांना आंदोलनाची एक तारीखही ठरवता येत नाही, असे म्हणत त्यांनी विरोधकांच्या कारभारावर ताशेरे ओढले. हे ही वृत्त वाचा जरांगे यांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक, आक्षेप केवळ भाषेवर:राऊतांनी सिंधुदुर्ग जमीन व्यवहाराचा विषय लावून धरावा- नीतेश राणे
राज्यात दुष्काळाची परिस्थिती आहे. महायुतीचे सरकार म्हणून आपण सर्वांनी जनतेला दिलासा दिला पाहिजे. महायुतीमधील मित्रपक्षांनी आपापसात अशा प्रकारे वक्तव्ये करू नयेत. सरकार म्हणून आपण एकजुटीने लोकांना कशी ताकद देऊ शकतो, यासाठी काम केले पाहिजे. मुख्यमंत्र्यांसोबत आपण कसे उभे राहू शकतो, याच पद्धतीने महायुतीच्या सर्व आमदारांनी काम केले पाहिजे, असा सल्ला शिवसेना विधान परिषदेचे आमदार रघुवंशी यांच्या वक्तव्यावर बोलताना मंत्री नीतेश राणे यांनी दिला. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *