![]()
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय 2026-27 रब्बी हंगामाच्या तयारीला अंतिम स्वरूप देण्यासाठी आजपासून दोन दिवसीय राष्ट्रीय कृषी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद 28 आणि 29 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत होत असून, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते तिचे उद्घाटन होणार आहे. या परिषदेसाठी महाराष्ट्राचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे देखील उपस्थित असून राज्यातील दुष्काळस्थितीचा आढावा या परिषदेमध्ये मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. पत्रकारांशी बोलताना कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, रब्बी हंगामाच्या दृष्टिकोनातून प्रत्येक राज्याचे काय नियोजन असणे गरजेचे आहे आणि शेतकऱ्यांसमोर, शेतीसमरो जे काही येणाऱ्या संभाव्य ज्या काही अडचणी या बाबतीत नियोजन कुठले नियोजन केले पाहिजे, माझ्या शेतकऱ्यांचे उत्पादन कसे वाढेल, उत्पादन खर्च कसा कमआय होईल आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहे की कमी पाण्यात तग धरणारे कुठले पिके घेणे गरजेचे आहे हे सगळ्याच विषयांवर आज चर्चा सुरू आहे. एल निनो जे संकट आहे, त्याबद्दल देखील चर्चा आहे आणि आगामी काळात देशातील तसेच राज्यातील शेतकऱ्यांना कोणती दिशा द्यावी लागेल, त्याबाबतीतले निर्णय हे कृषी विभागाच्या माध्यमातून घेतले जातील. पुढे बोलताना दत्तात्रय भरणे म्हणाले, केंद्राच्या वतीने आपल्या राज्याला, कृषी विभागाला, आपल्या शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन दिले गेले पाहिजे, या दृष्टिकोनातून आजची ही बैठक महत्त्वपूर्ण आहे. सर्वच राज्यांचे कृषिमंत्री, केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चव्हाण, त्यांचे दोन्ही राज्य मंत्री हे सगळे या बैठकीसाठी हजर आहेत. सॅटलाइट इमेज संदर्भातील अट शिथिल करण्याची मागणी पिकविम्याच्या संदर्भात जमीनिवरचा निकष देखील महत्त्वाचा आहे का? सॅटलाइट इमेजमधून हिरवळ दिसते मात्र पिकांचे उत्पन्न होत नाही, हा निकष कुठेतरी कमी करता येईल का? असा प्रश्न विचारला असता दत्तात्रय भरणे म्हणाले, मी शंभर टक्के त्याबाबतीत महाराष्ट्र शासनाच्या वतीने पत्र दिले आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील पत्र दिले आहे की सॅटलाइट इमेजच्या बाबतीत आपण जे म्हणलात ते खरे आहे की सॅटलाइट इमेजमधून जे दिसते त्याला 50 टक्के पिकविम्याला महत्त्व दिले जाते ही गोष्ट खरी आहे. आणि वरून सॅटलाइट इमेजमधून पीक हिरवं दिसते, परंतु खाली जर आपण पाहिले तर त्या पिकात पावसाचा खंड पडल्याने पिकाचे नुकसान झालेले असते. त्यामुळे यासंदर्भातील अट शिथिल करण्याबाबत आम्ही केंद्राला पत्र दिले आहे. केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चव्हाण महाराष्ट्राचा दौरा करणार दत्तात्रय भरणे पुढे म्हणाले की, शिवराजसिंह चव्हाण हे महाराष्ट्र राज्याचा दौरा करणार आहेत. त्यांना माहीत आहे की खरंच या देशात सर्वात मोठे नुकसान महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे झाले आहे. पीक वाया गेले आहे आणि शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. केंद्राच्या निधीची अपेक्षा आहे, त्या प्रमाणे मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी विनंती केली आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात ते महाराष्ट्रात येणार आहेत. राज्यात माझा शेतकरी किती अडचणीत आलेला आहे ते त्यांना दिसेल आणि महाराष्ट्राला भरीव अशी मदत केंद्राकडून मिळेल, अशी आशा भरणे यांनी व्यक्त केली आहे.
Source link
पीकविम्यासाठी सॅटेलाइट इमेजची अट शिथिल करण्याची मागणी:राज्यातील दुष्काळस्थितीचा आढावा मांडणार- कृषिमंत्री दत्तात्रय भरणे