![]()
भरधाव टँकरच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना पुणे-सोलापूर रस्त्यावर लोणी काळभोर भागात घडली. या प्रकरणी टँकर चालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अपघातात दुचाकीस्वार तरुण जखमी झाला. अनयकुमार उदयकुमार चौधरी असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. अपघातात दुचाकीस्वार अनय मंगेश कामदेव (वय २१, रा. तोरडोस हाईट्स, शेवाळवाडी, पुणे-सोलापूर रस्ता) जखमी झाला. याबाबत अनय कामदेव याने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, टँकर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार अनय आमि त्याचा मित्र अनयकुमार हे महाविद्यालयातून घरी निघाले होते. लोणी काळभोर परिसरात भरधाव टँकरने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी अनयकुमार आणि अनय हे जखमी झाले. गंभीर जखमी झालेल्या अनयकुमार याचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक एस जगताप तपास करत आहेत. बेपत्ता अल्पवयीनाचा मृतदेह नदीपात्रात सापडला पुणे स्टेशन परिसरातील ताडीवाला रस्ता भागातून बेपत्ता झालेल्या १७ वर्षीय युवकाचा मृतदेह चंदननगर भागातील नदीपात्रात सापडला. शिवकुमार बाबू वखरानी (वय १७ वर्ष ७ महिने, रा. ताडीवाला रस्ता, पुणे स्टेशनजवळ) असे मृतावस्थेत सापडलेल्या युवकाचे नाव आहे. शिवकुमार २६ सप्टेंबर रोजी ताडीवाला रस्ता परिसरातून रात्री दहाच्या सुमारास बेपत्त झाला. शिवकुमार याला आमिष दाखवून त्याचे अपहरण केल्याची फिर्याद त्याच्या आईने बंडगार्डन पोलीस ठाण्यात दिली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला. मंगळवारी (२९ ऑक्टोबर) सकाळी साडेआठच्या सुमारास शिवकुमारचा मृतदेह चंदननगर परिसरातील नदीपात्रात सापडला. सुरुवातीला मृतदेहाची ओळख पटलेली नव्हती. चौकशीनंतर मृतदेहाची ओळख पटली. चंदननगर पोलिसांनी मृतदेह ससून रूग्णालयात पाठविला. नातेवाईकांना याबाबतची माहिती देण्यात आली. शिवकुमार मृतावस्थेत सापडल्यानंतर नातेवाईकांनी पोलिसांनी योग्य पद्धतीने तपास केला नसल्याचा आरोप ससून रुग्णालयात पत्रकारांशी बोलताना केला. या प्रकरणाचा सखोल तपास करुन आरोपींना अटक करण्याची मागणी त्यांनी केली. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असल्याचे बंडगार्डन पोलिसांनी सांगितले. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूमागचे कारण स्पष्ट होईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. ‘ या प्रकरणाचा योग्य पद्धतीने तपास सुरू आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूमागचे कारण समजेल. नातेवाईकांनी केलेल्या आरोपाची दखल घेण्यात आली असून, तपास सुरू आहे’, असे परिमंडळ पाचच्या पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर यांनी स्पष्ट केले. हेही वाचा.. ट्युशन एरियात कोयता गँगची दहशत; विद्यार्थ्यांवर हल्ला:रिक्षाला कट लागल्याच्या कारणावरून नशेत धुंद टोळक्याचा धिंगाणा; विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण शहरातील ट्युशन एरिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिसरात पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत निर्माण झाली आहे. दुचाकीचा रिक्षेला धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून, नशेत धुंद असलेल्या टोळक्याने दोन विद्यार्थ्यांवर कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री घडली. या घटनेमुळे शिक्षणानिमित्त येथे राहणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आणि त्यांच्या पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सविस्तर वाचा
Source link
पुणे-सोलापूर रस्त्यावर टँकरच्या धडकेत महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू:दुचाकीस्वार मित्र जखमी, लोणी काळभोर भागात टँकर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल