Headlines

7 वर्षांपासून रखडलेल्या भरतीसाठी कोल्हापुरात आंदोलन:उपकेंद्र सहाय्यक भरती तात्काळ काढण्याची मागणी, शिकाऊ उमेदवारांच्या प्रश्नांवरूनही विद्यार्थ्यांचा संताप




महावितरणच्या उपकेंद्र सहाय्यक पदाची नवीन सरळसेवा भरती मागील सात वर्षांपासून झालेली नसल्याने या पदाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आज कोल्हापूर येथील महावितरण झोन कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी उपकेंद्र सहाय्यक पदाची भरती तात्काळ जाहीर करावी, तसेच महावितरणमध्ये Apprenticeship (शिकाऊ उमेदवारी) पूर्ण केलेल्या उमेदवारांना भरती प्रक्रियेत न्याय्य संधी द्यावी, या प्रमुख मागण्या करण्यात आल्या. महावितरणमध्ये उपकेंद्र सहाय्यक पदासाठी 2019 मध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यानंतर या पदासाठी नवीन सरळसेवा भरती झालेली नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून या पदाची तयारी करणारे ITI, तांत्रिक शिक्षण घेतलेले आणि शिकाऊ उमेदवारी पूर्ण केलेले उमेदवार भरतीच्या प्रतीक्षेत आहेत. महावितरणच्या अधिकृत नोंदीनुसार 2019 मधील उपकेंद्र सहाय्यक भरतीची प्रक्रिया 2026 मध्ये समाप्त करण्यात आली आहे. दरम्यान, 2023 मध्ये महावितरणमध्ये विविध पदांच्या भरती प्रक्रिया राबविण्यात आल्या; मात्र उपकेंद्र सहाय्यक पदासाठी नवीन भरती काढण्यात आली नाही, असा विद्यार्थ्यांचा आक्षेप आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून या पदाची तयारी करणाऱ्या उमेदवारांमध्ये नाराजी आहे. शिकाऊ उमेदवारांच्या प्रश्नावरही आंदोलन उपकेंद्र सहाय्यक भरतीबरोबरच महावितरणमध्ये Apprenticeship पूर्ण केलेल्या उमेदवारांना भरती प्रक्रियेत योग्य न्याय मिळावा, या मागणीसाठीही विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. महावितरणमध्ये अनेक उमेदवारांनी शिकाऊ उमेदवारीचे प्रशिक्षण पूर्ण केले असून, त्यानंतरही भरती प्रक्रियेत त्यांना अपेक्षित संधी मिळत नसल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. महानिर्मिती व महापारेषणमध्ये शिकाऊ उमेदवारी पूर्ण केलेल्या उमेदवारांना भरती प्रक्रियेत मिळणाऱ्या संधीच्या तुलनेत महावितरणमध्ये शिकाऊ उमेदवारांकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याचा विद्यार्थ्यांचा आक्षेप आहे. महावितरणने स्वतः 2018 च्या परिपत्रकात कंपनीतील शिकाऊ उमेदवारांच्या नोंदणीबाबत आणि Apprenticeship योजनेच्या अंमलबजावणीबाबत निर्देश दिले होते.
विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *