![]()
विदर्भ विभागात या पावसाळ्यात सरासरीपेक्षा 27 टक्के कमी पाऊस झाला आहे. यामुळे आगामी काळात मोठे जलसंकट आणि दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, अपेक्षित 937.3 मिमीच्या तुलनेत केवळ 687.3 मिमी पावसाची नोंद झाली. विभागातील 11 पैकी आठ जिल्ह्यांमध्ये पावसाची तूट 20 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक 43% कमी पाऊस झाला. त्यापाठोपाठ अकोल्यात 41%, वाशिममध्ये 37%, तर नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांत प्रत्येकी 34% पावसाची तूट नोंदवली गेली. चंद्रपूरमध्ये 33%, यवतमाळमध्ये 27% आणि बुलढाण्यात 21% तूट आहे. यामुळे खरीप हंगामानंतरच्या पिकांचे नियोजन आणि पाणीवापर महत्त्वाचा ठरणार आहे. दुसरीकडे, गोंदिया जिल्ह्यात पावसाची स्थिती जवळपास सरासरी राहिली, तर भंडारा आणि गडचिरोलीमध्ये प्रत्येकी 16% तूट नोंदवली गेली.
Source link
विदर्भात सरासरीपेक्षा 27 टक्के कमी पाऊस:11 पैकी 8 जिल्ह्यांची स्थिती चिंताजनक, आगामी काळात जलसंकटाची शक्यता