Headlines

Gunratna Sadavarte Slams Thackeray Brothers Over Mumbai Morcha Controversy


केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विशेष सघन पुनरीक्षण (SIR) मोहिमेवरून आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात ठाकरे बंधूंनी पुकारलेल्या 4 ऑक्टोबरच्या महामोर्चावर प्रसिद्ध वकील ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी अत्यंत आक्रमक शब्दांत टीका केली आहे. “र

.

तसेच, 4 ऑक्टोबर रोजी भायखळा ते मुंबई महानगरपालिका मुख्यालयादरम्यान निघणाऱ्या या मोर्चाला परवानगी मिळू नये आणि पोलिसांनी परवानगी दिल्यास गुन्हे दाखल व्हावेत, यासाठी उद्या (गुरुवारी) मुंबई पोलीस उपायुक्त (झोन 1) यांच्याकडे अधिकृत तक्रार दाखल करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

उद्धव ठाकरेंना ‘भीमटोला’चा अर्थ तरी माहिती आहे का?

पत्रकार परिषदेत बोलताना सदावर्ते यांनी दोन्ही ठाकरे बंधूंच्या संयुक्त पत्रकार परिषदेचा समाचार घेतला. “उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत ‘भीमटोला मारू’ अशी भाषा करत होते. त्यांना ‘भीमटोला’चा खरा अर्थ तरी ठाऊक आहे का? आयआयटीतील मागासवर्गीय विद्यार्थी वाकोडे याचा संशयास्पद मृत्यू झाला, तेव्हा हे ठाकरे बंधू त्याच्या आई-वडिलांचे सांत्वन करायला गेले होते का? त्या विद्यार्थ्याच्या मृत्यूची निष्पक्ष चौकशी व्हावी म्हणून यांच्या तोंडून साधा शब्द फुटला नाही. मात्र, स्वतःचे राजकीय दळण दळायचे असल्याने ज्ञानेश कुमार यांच्यावर बोलत आहेत. वंचित घटकांची आणि आंबेडकरी विचारांची अशी सोयीस्कर ढाल करणे अत्यंत गलीच्छ राजकारण आहे.”

“संसदेच्या किंवा सभेच्या गॅलरीत बसणाऱ्या शरद पवार यांची आज दया येते. माणसाला त्याच्या कर्माची फळे भोगावीच लागतात. जे राजकारणात पेरले, तेच आज उगवले आहे.”

अभिजीत दिपकेच्या खांद्यावर बंदूक ठेवून ‘लिटमस टेस्ट’

2 ऑक्टोबर रोजी मुंबईत होणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) आंदोलनावरून त्यांनी ठाकरे बंधूंवर तोफ डागली. “केजरीवाल यांच्याकडे काम करणारा मुलगा अभिजीत दिपके आता म्हणे ‘जेल भरो’ आंदोलन करणार! कॉकरोच जनता पार्टी ही कोणती राजकीय पार्टी नसून केवळ एक सोशल मीडिया पेज आहे. संपूर्ण शरीराचे रक्त न तपासता दोन थेंब तपासून जशी ‘लिटमस टेस्ट’ केली जाते, तशीच ही मुले पुढे करून ठाकरे बंधू स्वतःच्या मोर्चाची गर्दी तपासत आहेत.”

स्वातंत्र्योत्तर भारतात ‘जेल भरो’ असंवैधानिक

“डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शेवटचे भाषण प्रत्येकाने वाचले पाहिजे. स्वातंत्र्योत्तर भारतात ‘जेल भरो’ किंवा बेमुदत आमरण उपोषण या गोष्टी कायद्याच्या कसोटीवर बसत नाहीत. स्वतःहून गुन्हे करायचे आणि पोलिसांनी अटक करावी असा हट्ट धरायचा, ही कसली लोकशाही? शिवाजी पार्क हा सायलंट झोन (शांतता क्षेत्र) आहे. तिथे ज्येष्ठ नागरिक, उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती राहतात. अशा ठिकाणी 6 डिसेंबर, 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीव्यतिरिक्त कोणत्याही बेकायदेशीर आंदोलनाला परवानगी देता कामा नये.”

दिवाळीच्या दिव्यांवरून राज ठाकरेंना इशारा

“ज्याप्रमाणे शिवाजी पार्कवरून अशा आंदोलकांना हाकलले पाहिजे, त्याचप्रमाणे येणाऱ्या दिवाळीत शिवाजी पार्कवर राज ठाकरे यांच्याकडून लावल्या जाणाऱ्या विद्युत रोषणाईलाही स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासनाने चाप लावला पाहिजे. एकाच्या आनंदासाठी संपूर्ण परिसरातील नागरिकांना वेठीस धरता येणार नाही.”

संदीप देशपांडेंना सुनावले- शिवाजी पार्क कोणाच्या बापाचे नाही, कायदा हाच सगळ्यांचा बाप!

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवाजी पार्कच्या मैदानाबाबत केलेल्या वक्तव्यावर सदावर्ते यांनी कडक आक्षेप घेतला. “संदीप देशपांडे हुशार नेते आहेत, पण त्यांनी भपकेबाज वक्तव्ये करू नयेत. शिवाजी पार्क हे रिक्रिएशन ग्राउंड असून मुंबई उच्च न्यायालयाने वर्षातील केवळ 45 ते 46 दिवस विविध कार्यक्रमांसाठी निश्चित केलेले आहेत. त्यामुळे तिथे कोणतीही मनमानी चालणार नाही. कोणी म्हणत असेल की शिवाजी पार्क कोणाच्या बापाचे आहे का, तर त्यांनी लक्षात ठेवावे की कोणाचीही जहागिरी नसते; लोकशाहीत आणि संविधानात ‘कायदा हाच सर्वांचा बाप’ असतो!”

मनोज जरांगे, उदय सामंत आणि एकनाथ शिंदे यांच्यावर टोलेबाजी

आरक्षण आंदोलनावरून सुरू असलेल्या घडामोडींवर सदावर्ते यांनी चिमटे काढले. “उद्योगमंत्री उदय सामंत म्हणतात की खऱ्या अर्थाने संघर्ष योद्धा एकनाथ शिंदे आहेत. म्हणजे ज्या मनोज जरांगेंना मराठा समाजाने संघर्ष योद्धा म्हटले होते, त्यांची ती पदवी आता मंत्र्यांनीच काढून घेतली आणि शिंदेंच्या गळ्यात अडकवली. ‘काम सरो आणि वैद्य मरो’ अशी जरांगेंची अवस्था झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी यावर खुलासा करावा की, त्यांनी ही पदवी स्वीकारली आहे का?”

“निवडणूक आयोग ही पूर्णपणे स्वायत्त व संवैधानिक संस्था आहे. जर ठाकरे बंधूंचे काही आक्षेप असतील, तर त्यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करावी. न्यायालये आणि निवडणूक आयोगासारख्या संस्थांची गरिमा धुळीस मिळवण्याचे असंवैधानिक उद्योग त्यांनी बंद करावेत,” असा सल्लाही ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी दिला.

————————-

हेही वाचा…

ठाकरेंनी 4 तारखेचा मोर्चा ऑनलाईन काढावा, वाचणारे पैसे शेतकऱ्यांना द्यावेत:कर्ज काढून का होईना शेतकऱ्यांना मदत करू, आम्ही मेवा खात मातोश्री 2 बांधत नाही- नवनाथ बन

शेतकरी संकटात असताना आम्ही हातावर हात ठेवून बसू शकत नाही. कर्ज काढून का होईना, आम्ही शेतकऱ्यांना मदत करू. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याची परंपरा उबाठा गटाची होती. आम्ही शेतकऱ्यांना साथ देतो, म्हणून देवाभाऊंचे सरकार शेतकऱ्यांचे आहे. आम्ही मेवा खात ‘मातोश्री 2’ बांधत नाही, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.