Headlines

राज्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत द्या:अन्यथा मंत्र्यांना गावात फिरू देणार नाही, रवीकांत तुपकर यांचा इशारा




राज्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये आर्थिक मदत पुढील आठ दिवसांत त्यांच्या बँक खात्यात जमा करावी अन्यथा राज्यातील सर्वच मंत्र्यांना गावात फिरू देणार नाही असा इशारा क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रवीकांत तुपकर यांनी बुधवारी ता. ३० हिंगोली येथे दिला आहे. हिंगोली येथे शेतकऱ्यांच्या विविध प्रश्‍नांवर क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या वतीने बुधवारी मोर्चा काढण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरातून काढण्यात आलेला मोर्चा शहरातील प्रमुख मार्गावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. यावेळी तुपकर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते. यावेळी बोलतांना तुपकर म्हणाले की, शासनाने दुष्काळाच्या बाबतीत काढलेला शासन निर्णय मान्य नाही. विद्यार्थ्यांचे परिक्षा शुल्क अगदीच कमी आहे, कर्ज वसुलीला स्थागिती दिली मात्र कर्जमाफीत अनेकांचे कर्ज माफ झाले असतांना वसुलीचा प्रश्‍न यतोच कुठे असा सवाल त्यांनी केला. त्यामुळे शासनाने असले शासन निर्णय काढून शेतकऱ्यांच्या जखमेवर मिठ चोळण्यापेक्षा शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची मदत हेक्टरची मर्यादा न टाकता सरसगट जाहिर करून पुढील आठ दिवसांत मदतीची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करावी. शासनाने आठ दिवसांत निर्णय न घेतल्यास राज्यातील मंत्र्यांना गावात फिरू देणार नाही असा इशारा त्यांनी दिला. यावेळी तुपकर यांनी हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या कार्यपध्दतीवर टिका केली. लोकप्रतिनिधीच्या दबावाखाली येऊन संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे यांना हिंगोली जिल्हयातून तडीपार केल्याचा आरोप त्यांनी केला. मटका, जुगार, चालविणाऱ्यांवर कारवाई होत नाही मात्र चळवळीतील पदाधिकाऱ्यांवर कारवाई करून चळवळीचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न असून जिल्हाधिकारी गुप्ता हे इंग्रजाचा वारसा चालविता असल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र तडीपार झालेले लोकच पुढे मोठे होताच हे त्यांनी उदाहरणासह सांगितले. हिंगोली जिल्हयात लवकरच पुन्हा येणार असून त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांचा प्रतिकात्मक पुतळा करून पुतळ्याचा भाजपात प्रवेश करणार असल्याचे सांगितले. जिल्हाधिकारी गुप्ता यांच्या गैरव्यवहाराची प्रकरणे बाहेर काढून वर्षा बंगल्यावरून चौकशी करण्यास भाग पडणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *