राज्यात दुष्काळाची परिस्थिती आहे. महायुतीचे सरकार म्हणून आपण सर्वांनी जनतेला दिलासा दिला पाहिजे. महायुतीमधील मित्रपक्षांनी आपापसात अशा प्रकारे वक्तव्ये करू नयेत. सरकार म्हणून आपण एकजुटीने लोकांना कशी ताकद देऊ शकतो, यासाठी काम केले पाहिजे. मुख्यमंत्र्
.
मंत्री नीतेश राणे म्हणाले की, शरद पवारांनी काय बोलावे आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी काय करावे, हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या सूचनांबद्दल सरकार सकारात्मक आहे. आक्षेप केवळ त्यांच्या भाषेवर आहे, ते जे मराठा समाजासाठी मुद्दे मांडत आहेत, ते मान्य केले जात आहेत. आमच्यात आणि जरांगे पाटील यांच्यात उत्तम संवाद आहे. जरांगे पाटील यांच्या सहकाऱ्यांना नोटीस का दिल्या, हा विषय वेगळा असून त्याचे उत्तर यंत्रणेने दिले पाहिजे, असे नीतेश राणे म्हणाले.
संजय राऊत यांच्यावर टीका
नीतेश राणे म्हणाले की, संजय राऊत यांनी सिंधुदुर्गच्या जमीन व्यवहाराबद्दल जो मुद्दा मांडला, तो अत्यंत योग्य आहे. त्यांनी मागे हटता कामा नये; यामध्ये कोणाकोणाचे वस्त्रहरण होते, हे त्यांनाही कळेल आणि नेमके सत्य काय आहे, ते बाहेर येईल. त्यांनी सर्व माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यांना मी बाळासाहेब ठाकरेंची शपथ दिली असती, पण त्यांच्यासाठी राहुल गांधी जास्त महत्त्वाचे आहेत. राऊतांना त्यांचीच शपथ आहे, त्यांनी सिंधुदुर्गच्या व्यवहाराबद्दलचा विषय लावून धरावा, आम्ही त्यांच्यासोबत आहोत. राऊत तोंड उघडत असल्यामुळे आदित्य ठाकरे आधीच दिशा सालियन प्रकरणात अडचणीत आले आहेत; ते असेच बोलत राहिले, तर त्यांच्या पक्षातील किती लोक अडचणीत येतील, हे पुढे समजेल.

राहुल गांधी राऊतांचे नवे मालक
नीतेश राणे म्हणाले की, राऊतांनी हा मुद्दा सोडू नये आणि सर्व माहिती जाहीर करावी. राऊतांचे नवीन मालक राहुल गांधी असून, त्यांच्याकडून राऊतांना दिवाळीचा बोनस येणार आहे, त्याची शपथ घेऊन त्यांनी सर्व माहिती समोर आणावी, असा टोमणा त्यांनी मारला. राणे कुटुंब कधीही दलालीवर जगले नाही. मात्र, खिचडीच्या दलालीवर जगणाऱ्या राऊतांनी आमच्यावर टीका करू नये. जुन्या शिवसैनिकांना विचारले, तर राणे साहेबांनी किती आर्थिक ताकद दिली होती, हे त्यांना समजेल. त्यावेळी राऊत ‘सामना’मध्ये नव्हे, तर दुसऱ्या ठिकाणी काम करत होते. लोकसभा निवडणुकीवेळी खासदार निवडून आले, त्यावेळी ठाकरे बंधूंनी मोर्चा का काढला नाही? कारण, त्यावेळी रोहिंग्यांच्या मतांवर खासदार निवडून आल्याने त्यांच्या विजयी मिरवणुकीत पाकिस्तानी झेंडे आणि ‘सर तन से जुदा’च्या घोषणा देण्यात आल्या होत्या. त्यावेळी यांना वोटचोरी का दिसली नाही, असा सवाल राणेंनी केला.
..तर आम्ही 400 पार गेलो असतो
नीतेश राणे म्हणाले की, निवडणूक आयोगात संवाद आणि वाद होत असेल, तर ती चांगल्या लोकशाहीची लक्षणे आहेत. निवडणुकीत संवाद होतो, ही चांगलीच गोष्ट आहे. तिथे संवाद होत असेल आणि लोकशाही मार्गाने निर्णय होत असतील, तर निवडणूक आयोग दबावाखाली नाही, हे स्पष्ट होते. जर निवडणूक आयोग दबावाखाली असता, तर आम्ही 400 पार गेलो असतो, बारामती आणि वरळीत तुमचा विजय झाला नसता आणि वाराणसीमध्ये आमचा पराभव झाला नसता. निवडणूक आयोगावर टीका करताना आमचा उल्लेख केला जातो, म्हणूनच आम्ही उत्तर देतो, असे राणे म्हणाले.
दुष्काळामुळे मच्छिमारांचे नुकसान
नीतेश राणे म्हणाले की, छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील तीन धरणांची आम्ही प्रत्यक्ष पाहणी केली आणि तिथल्या मच्छिमारांच्या भावना जाणून घेतल्या. राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे सरकारकडून सरकट मदतीचा जो दिलासा देण्यात आला आहे, त्याचप्रमाणे मच्छिमारांनाही मदत देण्यात यावी, अशी आमची मागणी आहे. मच्छिमार आणि तलावांची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. त्यांना आधार देणे गरजेचे आहे, कारण मागच्या वेळी पूरस्थिती होती आणि आता त्यांना मदत करणे ही आमची जबाबदारी आहे. त्यामुळे बँकांनी मच्छिमारांवर आत्महत्येची वेळ येईल, असे वर्तन करू नये, असेही नीतेश राणे म्हणाले.
हे ही वृत्त वाचा
मराठा आंदोलनातील वाद चव्हाट्यावर:कोणाला किती पॅकेज मिळाले, 2023 पासून चौकशी करा, जरांगे समर्थकांविरोधात ललिता तारख आक्रमक पवित्रा

मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी उपोषण करून महायुती सरकारला अनेकदा जेरीस आणणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी गणेशोत्सपूर्वी 29 ऑगस्ट रोजी जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले होते. ते मुंबईच्या दिशेने निघाल्यानंतर प्रकृती खालावल्याने 20 व्या दिवशी बीडमधील पाटोदा येथे त्यांनी उपोषण मागे घेतले होते. मात्र, या आंदोलनानंतर जरांगे यांचे सहकारी एकामागून एक अडचणीत सापडत असल्याचे चित्र आहे. वाचा सविस्तर