![]()
पाचोड पावसाने मारलेल्या ५० दिवसांच्या खंडामुळे खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत खासदार संदीपान भुमरे आणि पैठण तालुक्याचे आमदार विलास भुमरे यांनी (दि. २४) मुरमा व लिंबगाव येथे दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. “येथील एकही शेतकरी दुष्काळी मदतीपासून वंचित राहता कामा नये,’ असे स्पष्ट करत पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश आमदार भुमरे यांनी प्रशासनाला दिले. आमदार भुमरे यांनी मुरमा येथील शेतकरी कचरू बाबरे यांच्या सोयाबीन पिकाची, तर लिंबगाव येथील भागवत निर्मळ यांच्या कपाशी व तूर पिकाची पाहणी केली. दीर्घ खंडामुळे पिकांची झालेली दयनीय अवस्था त्यांनी प्रत्यक्ष पाहिली. तसेच शेतकऱ्यांकडून अपेक्षित घट, पाण्याचा तुटवडा आणि वाढत्या खर्चाबाबत माहिती घेतली. ‘राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून नुकसानग्रस्त बळीराजाला न्याय मिळवून दिला जाईल,’ अशी ग्वाही त्यांनी दिली. सोबतच, “दुष्काळी परिस्थितीवरून विरोधी पक्षांनी राजकीय भांडवल करू नये,’ असा सल्लाही त्यांनी दिला. या पाहणी दौऱ्यात तहसीलदार ज्योती पवार, तालुका कृषी अधिकारी विकास पाटील, गटविकास अधिकारी मनोरमा गायकवाड, सहायक पोलिस निरीक्षक सचिन पंडित, आप्पासाहेब निर्मळ, दिनकर मापारी, एकनाथ फटांगडे, अक्षय लेंभे, अरुण फटांगडे, कचरू बाबरे, उद्धव मगरे यांच्यासह परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Source link
मुरमा येथे आ. भुमरे यांच्याकडून दुष्काळी परिस्थितीची पाहणी:नुकसानीचे पंचनामे करण्याचे आ. भुमरेंचे आदेश