![]()
पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने पैठण तालुक्यातील खरीप हंगामातील ७५ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रातील पिके संकटात सापडली आहेत. पावसाच्या मोठ्या खंडामुळे सोयाबीन, कापूस, मका यांसह विविध पिकांच्या उत्पादनाला ५० टक्के फटका बसला आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे श
.
जून ते १८ सप्टेंबर २०२६ या कालावधीत पैठण तालुक्यात सरासरी ४७१.३ मिलिमीटर पाऊस अपेक्षित होता. प्रत्यक्षात ३५७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पावसाचे प्रमाण सरासरीच्या तुलनेत अवघे २० ते ३० टक्के राहिले. ११ ते ४८ दिवसांपर्यंत पावसाचा खंड पडला. पिकांच्या वाढीवर परिणाम झाला आहे. अनेक भागांत पिके माना टाकू लागली आहेत. खरीप हंगाम हातचा जाण्याची भीती व्यक्त होत आहे.
पावसाअभावी सोयाबीनच्या शेंगांमध्ये दाणे भरण्याचे प्रमाण ७० टक्क्यांनी घटले आहे. कापसाची वाढ खुंटली आहे. रसशोषक किडींसह विविध कीड-रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. पातेगळ होत आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. कृषी विभागाच्या अंदाजानुसार, काही पिकांच्या उत्पादनात ६० टक्क्यांपेक्षा अधिक घट होणार आहे. त्यामुळे बियाणे, खते, औषधे आणि मशागतीवर केलेला खर्चही निघणार नाही.
दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना शासनाकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीचे वेध लागले आहेत. नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे, मदतीसाठी लागू असलेले निकष, प्रत्यक्ष अनुदानाचे वितरण याबाबत शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता आहे. दुष्काळ जाहीर झाला आहे. मदत प्रत्यक्ष खात्यात जमा होईपर्यंतचा कालावधी महत्त्वाचा ठरणार आहे. दुष्काळ जाहीर झाला आहे. मात्र प्रत्यक्षात मदत कधी मिळणार, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. लवकर मदत जाहीर होईल, असे पैठणचे कृषी अधिकार विकास पाटील यांनी सांगितले.
रब्बीच्या पेरण्यांचेही गणित बिघडणार खरीप हंगामातील नुकसानीबरोबरच आगामी रब्बी हंगामाचेही संकट उभे ठाकले आहे. जमिनीतील ओलावा कमी झाल्याने रब्बीच्या पेरण्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. पावसाने पुन्हा दडी मारल्यास जनावरांच्या चाऱ्याची टंचाईही तीव्र होऊ शकते. त्यामुळे खरीप उत्पादनातील घट, चाऱ्याची उपलब्धता आणि रब्बीच्या पेरण्यांसाठी लागणारा खर्च, अशा तिहेरी संकटाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे.
तात्काळ शेतकऱ्यांना मदत द्यावी, अथवा रस्त्यावर आंदोलन करू Ãसरकारने दुष्काळ जाहीर केला आहे, मात्र मदत कधी मिळणार व काय मिळणार हा प्रश्न आहे. प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हातात मदत पडेपर्यंत काही सांगता येणार नाही, तात्काळ शेतकऱ्यांना मदत द्यावी नसता लवकरच आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करु. -अनिल पटेल, माजी मंत्री