Headlines

कोरड्या दुष्काळाचा जीआरही कोरडाच:भाळवणीत शासन निर्णयाची केली होळी, सरसकट मदत द्या, पंचनाम्यांचा फार्स कशाला’, कर्जमाफीवरूनही सरकारवर टीका‎



नेहमीप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांनी मोठे मोठ्या घोषणा केल्या,हे फक्त उद्योगपतींचे सरकार असून, कर्जमाफी योजनेचा लाभ जिल्ह्यातील केवळ ६ टक्के शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्याचा आरोप करत, दुष्काळ जाहीर करूनही शेतकऱ्यांच्या हातात थेट मदत पडत नसल्याच्या निषेधार्थ

.

या वेळी खासदार शिंदे म्हणाल्या, निसर्ग साथ देत नाही, तेव्हा मायबाप सरकार यांनी मदत करायची असते, हे सरकार मदत करण्याच्या मानसिकतेत आहे ते फक्त उद्योगपतींना आहे, सरकारने उद्योगपतींचे कर्ज माफ केले आहे, शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याची यांची मानसिकता नाही शेतकऱ्यांची चेष्टा केली जात आहे. कर्जमाफी करण्याचे नाटक या सरकारने केले आहे. दुष्काळ जाहीर केला, मग पंचनामे करण्याची गरजच काय? असा सवाल उपस्थित केला.

काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत साळे म्हणाले, तालुक्यातील शेती, पाणी आणि शेतकरी प्रश्नांवर काँग्रेसच्या माध्यमातून सातत्याने आंदोलने करण्यात आली असून, खासदार प्रणिती शिंदे यांच्या माध्यमातून हे प्रश्न शासन दरबारी मांडले जात असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी काँग्रेसचे राज्यसचिव ॲड. रविकिरण कोळेकर, तालुकाध्यक्ष प्रशांत साळे, विष्णू चोगुले, पांडुरंग चोगुले, सरपंच लक्ष्मण गायकवाड, मच्छिंद्र पाटील, किशोर भंडगे, रावसाहेब बेंडगे, विठ्ठल लोंढे, यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सरसकट मदत व १०० टक्के पीकविमा यंदा पावसाने हुलकावणी दिल्यामुळे जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळ जाहीर केल्यानंतरही पीक नुकसानीचे पंचनामे करण्याची आवश्यकता कशासाठी? शेतकऱ्यांना मदत करायची असेल तर सरसकट मदत जाहीर करा. पाण्याच्या टँकरसाठी प्रस्ताव मागण्याऐवजी दुष्काळ जाहीर झाल्यानंतर तात्काळ टँकर मंजूर करा. पीक नुकसानीची १०० टक्के नोंद करून पीकविम्याची रक्कम मिळावी, अशी मागणी खासदार शिंदे यांनी केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *