Headlines

गुंतवणुकीच्या आमिषाने महिलेची 25 लाखांची फसवणूक:वाघोलीत एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल; अडीच वर्षांत घडला प्रकार, पोलीस तपास सुरू.




गुंतवणुकीच्या आमिषाने एका महिलेची २५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी वाघोली पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत एका महिलेने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी योगेश विठ्ठल शिंदे (वय ४५, रा. खराडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ४० वर्षीय महिला वाघोली-लोहगाव रस्त्यावरील एका सोसायटीत राहायला आहेत. आरोपीची महिलेशी ओळख झाली होती. आरोपीने महिलेला गुंतवणुकीचे आमिष दाखविले. गेल्या अडीच वर्षांत महिलेने आरोपीच्या बँक खात्यात वेळोवेळी २५ लाख रुपये जमा केले. पैसे जमा केल्यानंतर आरोपीने त्यांना परतावा दिला नाही. परताव्याबाबत विचारणा केल्याने आरोपीने टाळाटाळ सुरू केली. महिलेने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली असून, सहायक पोलीस निरीक्षक विजय चंदन तपास करत आहेत. सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाची १४ लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका ६४ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाच्या मोबाइल क्रमांकाव संदेश पाठविला. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी त्यांना दाखविले. तक्रादाराला शेअर बाजारातील गुंतवणूक योजनांची माहिती आरोपींनी दिली. चोरट्यांच्या आमिषाला ते बळी पडले. चोरट्यांच्या खात्यात त्यांनी वेळोवेळी पैसे जमा केले. पैसे जमा केल्यानंतर त्यांना परातावा दिला नाही. फस‌वणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक चांगदेव सजगणे तपास करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *