![]()
अमरावती ग्रामीण पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या एका अट्टल टोळीवर कठोर कारवाई केली आहे. या टोळीतील सहा आरोपींवर संघटित गुन्हेगारीचे कलम (मकोका) लावले आहे. परतवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्यात त्यांचा थेट सहभाग होता. टोळीचा प्रमुख अक्षय बाळू जुनघरे (वय ३१) याच्यासह श्रीरंग रत्नपारखी, आकाश कंगाले, साहिल वाकपांजार, प्रशिक बारसे आणि आकाश धुर्वे या सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. ही टोळी गेल्या १० वर्षांपासून शहरात दहशत निर्माण करत होती. जुनघरेवर १० गंभीर गुन्हे दाखल आहेत. स्वतःचा दबदबा निर्माण करण्यासाठी टोळी सातत्याने गुन्हे करत होती. परतवाडा येथील घरफोडीत सहभाग सिद्ध झाल्यावर, तपासाअंती भारतीय न्याय संहितेच्या कलम ११२ नुसार संघटित गुन्हेगारीचे कलम लावले. पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार अजय आकरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
Source link
अमरावतीत घरफोडी करणाऱ्या 6 अट्टल गुन्हेगारांवर 'मकोका':परतवाडा पोलिसांनी केली कारवाई, 10 वर्षांपासून टोळीची दहशत