Headlines

तपासावर वकिलांचा आक्षेप:घोसाळकर हत्या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या तपासावर ताशेरे, सीबीआयची एंट्री, राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा आले चर्चांना उधाण




माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने कायदेशीर कारवाई करत न्यायालयात पुरवणी आरोपपत्र दाखल केले. या पुरवणी आरोपपत्रामुळे या प्रकरणातील गूढ उकलण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच घोसाळकर कुटुंबीयांचे वकील अ‍ॅड. भूषण महाडिक यांनी मुंबई पोलिसांच्या प्राथमिक तपासावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. ‘पोलिसांना अनेक महत्त्वाच्या बाबींची सखोल तपासणी करण्यात पूर्णपणे अपयश आले,’ असा थेट आरोप त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर राजकीय समीकरणांमध्ये मोठी उलथापालथ पाहायला मिळाली होती. पतीच्या हत्येनंतर त्यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. हत्येच्या वेळी त्यांनी कोणाचेही थेट नाव घेऊन आरोप केले नसले तरी त्यांचा रोख सत्ताधारी पक्षाच्या दिशेनेच राहिला होता. तेजस्वी घोसाळकर या सध्या भाजपच्या तिकिटावर मुंबईतील प्रभाग क्रमांक २ मधून नगरसेविका म्हणून कार्यरत आहेत. या पार्श्वभूमीवर सीबीआयच्या या नव्या पावलाने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. अशी आहे प्रकरणाची पार्श्वभूमी फेसबुक लाइव्हदरम्यान घडले होते हत्याकांड माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची फेसबुक लाइव्ह सुरू असताना ८ फेब्रुवारी २०२४ रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या धक्कादायक घटनेनंतर संशयित मारेकऱ्यानेही आत्महत्या केली होती. या हत्याकांडामुळे मुंबईच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर तसेच राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटले होते. घटनेतील संशयास्पद बाबी आणि कुटुंबीयांची मागणी लक्षात घेऊन या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. घोसाळकर हत्याकांडातील गूढ उकलणार सीबीआयची धडक कारवाई : तपास हाती घेतल्यानंतर सीबीआयने गुन्ह्यातील मूळ धागेदोरे, संशयितांची भूमिका आणि आर्थिक देवाणघेवाण यासारख्या बाबींचा बारकाईने अभ्यास करून हे पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. मुंबई पोलिसांच्या भूमिकेवर आक्षेप घोसाळकरांचे वकील अ‍ॅड. भूषण महाडिक यांच्या म्हणण्यानुसार, पोलिसांनी केलेल्या सुरुवातीच्या तपासात अनेक त्रुटी राहिल्या होत्या. तपासाच्या दृष्टीने निर्णायक ठरू शकणाऱ्या अनेक पैलूंकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. नवे खुलासे होण्याची शक्यता सीबीआयच्या आरोपपत्रामुळे हत्येमागील षड््यंत्र, पडद्यामागील सूत्रधार आणि इतर संबंधितांची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *