Headlines

गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता ही सेवा अभियान:निफाड नगरपंचायतीची‎विशेष स्वच्छता मोहीम‎




नगरपंचायतीच्या वतीने ‘स्वच्छता ही सेवा – २०२६’ अभियानांतर्गत गांधी जयंतीनिमित्त ‘एक दिवस, एक तास, एकसाथ’ या संकल्पनेतून गुरुवारी संगमेश्वर मंदिर परिसर व निफाड शहर येथे विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले. या स्वच्छता मोहिमेत निफाड नगरपंचायतीच्या अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांच्या सहभागातून संगमेश्वर मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली. परिसरातील कचरा संकलित करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली. तसेच नागरिकांमध्ये स्वच्छता, कचरा व्यवस्थापन व सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्याबाबत जनजागृती करण्यात आली. आरोग्य तपासणी शिबिर स्वच्छता कर्मचारी तसेच नगरपंचायतीतील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन आपला दवाखाना, निफाड नगरपंचायत येथे करण्यात आले होते. या शिबिरामध्ये स्वच्छता कर्मचारी तसेच नगरपंचायतीतील अधिकारी व कर्मचारी यांची विविध आरोग्य तपासणी करण्यात आली. आरोग्यविषयक आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *