![]()
तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या ‘ट्रिगर १’ दुष्काळी यादीत समावेश करावा, या मागणीसाठी तहसील कार्यालयाच्या आवारात सहा शेतकऱ्यांनी सुरू केलेले अन्नत्याग उपोषण तहसीलदार अनिल चव्हाण यांच्या आश्वासनानंतर तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. मात्र, १३ ऑ
.
यंदाच्या खरीप हंगामात पावसाने ओढ दिल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे चांदवड तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. असे असतानाही शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीतून चांदवड तालुका वगळण्यात आल्याने शेतकऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला.
शेतकरी नेते संपतबाबा वक्टे, संजय गुंजाळ, अनिल गुंजाळ, संदीप चव्हाण, कैलास जाधव आणि दत्तू ठाकरे यांनी मंगळवारी (दि. २९) तहसील कार्यालयाच्या आवारात अन्नत्याग उपोषण सुरू केले होते. बुधवारी उपोषणकर्त्यांची नायब तहसीलदार राहुल निकम, तालुका कृषी अधिकारी नीलेश मावळे आणि पोलिस निरीक्षक अभिजित सोनवणे यांनी भेट घेतली. यावेळी उपोषणकर्त्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फ त शासनाकडे सादर करण्यात आले असून, पुढील कार्यवाही शासनस्तरावर होणार असल्याचे तहसीलदार अनिल चव्हाण यांनी पत्राद्वारे कळविले. तहसीलदारांच्या या आश्वासनानंतर उपोषणकर्त्यांनी आपले अन्नत्याग उपोषण तात्पुरते स्थगित केले.