![]()
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील अत्यंत धोकादायक राहुड घाटात मागील पाच वर्षांत २१ निष्पाप प्रवाशांनी जीव गमावला आहे. त्यामुळे वारंवार होणाऱ्या भीषण अपघातांना आळा घालण्यासाठी त्वरित कायमस्वरूपी सुरक्षा उपाययोजना कराव्यात, तसेच चांदवड, देवळा, मालेगा
.
तसेच मंगरूळ येथील ‘रिद्धी सिद्धी टोल वे कंपनी’लाही निवेदन देण्यात आले. आठ दिवसांत ठोस निर्णय न घेतल्यास चिंचवे ग्रामस्थ व उमराणे प्रेस क्लबच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. निवेदनानुसार, राहुड घाटातील तीव्र उतार व धोकादायक वळणांमुळेअवजड वाहनांचे ब्रेक निकामी होऊन अनेक अपघात झाले आहेत. यामध्ये नागरिकांचा मृत्यू होऊन अनेक कुटुंबे उध्वस्त झाली आहेत. यापूर्वी उपोषण व आंदोलने झाल्यानंतरही प्रशासनाने तात्पुरत्या उपाययोजना केल्या. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा कायमस्वरूपी सुरक्षा आराखडा अद्याप कागदावरच असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. निवेदन देताना उमराणे प्रेस क्लबचे अध्यक्ष संजय देवरे, माजी अध्यक्ष विनोद पाटणी, भगवान देवरे, संदीप देवरे, शरद पवार, अनिल पाटणी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, तीव्र चढ-उतार व धोकादायक वळणांमुळे या मार्गाची रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाकडून अधिकृत ‘ब्लॅकस्पॉट’ म्हणून नोंद करण्यात आली आहे. अपघात झाल्यास मनमाड, मालेगाव, चांदवड, नाशिक व धुळे या ५ महत्त्वाच्या जिल्ह्यांतील वाहतूक तासन्तास ठप्प होते.
अपघातप्रवण भागात कायमस्वरूपी सुरक्षा उपाययोजना व आपत्कालीन सुरक्षा व्यवस्था उभारावी. अवजड वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवून रस्त्याची तांत्रिक पाहणी करावी व कायमस्वरूपी सुरक्षा आराखडा तयार करावा. स्थानिक शेतकरी, व्यापारी, कर्मचारी व नागरिकांकडून होणारी टोलवसुली बंद करून चांदवड, देवळा, मालेगाव व नांदगाव तालुक्यातील स्थानिक वाहनांना टोलमुक्त करावे.