Headlines

शिक्षण, संस्कार अन् माणुसकीने जीवनात मिळेल खरा आनंद:श्रीराम शिक्षण संस्थेच्या व्याख्यानमालेत ”जाऊ आनंदाच्या गावा” विषयावर भाष्य



“जीवनात खरा आनंद मिळवायचा असेल, तर शिक्षण, संस्कार, नम्रता आणि माणुसकीची वाट धरली तरच जीवनात खरा आनंद मिळेल. आई-वडिलांच्या कष्टांची जाणीव ठेवून शिक्षकांचा आदर करणे आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीशी सन्मानाने वागणे, हाच आनंदी जीवनाचा खरा मार्ग आहे,” असे

.

श्रीराम शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेच्या चौथ्या दिवशी ‘जाऊ आनंदाच्या गावा’ या विषयावर ते बोलत होते. कथाकथन, विनोद, जीवनातील अनुभव आणि विविध प्रसंगांच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याचा संदेश दिला.

ते पुढे म्हणाले की, “कॉलेज जीवन हे उत्साह, उमेद आणि स्वप्नांनी भरलेले असते. या वयात भावनांना योग्य दिशा देण्यासाठी संस्कारांची गरज असते. शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच चांगले संस्कार देऊन त्यांचे व्यक्तिमत्त्व घडवावे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये मोठी स्वप्ने पाहण्याची आणि ती पूर्ण करण्याची क्षमता असून, शिक्षण हे परिस्थिती बदलण्याचे प्रभावी माध्यम आहे.

आई-वडिलांना आपल्या मुलाने अभ्यासात प्रगती करावी, यापेक्षा मोठा आनंद नसतो. विद्यार्थ्यांच्या यशापयशात मनापासून सहभागी होणारे शिक्षक हेही त्यांच्या जीवनातील महत्त्वाचे मार्गदर्शक असतात. त्यामुळे आई-वडिलांच्या कष्टांची जाणीव ठेवून शिक्षकांप्रती आदर आणि कृतज्ञता बाळगावी, असे आवाहन त्यांनी केले. दुसऱ्याचे कौतुक करत सातत्याने प्रयत्न करणे आणि यश मिळाल्यानंतरही नम्र राहणे, हेच यशस्वी जीवनाचे सूत्र असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. श्रीराम व्याख्यानमालेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचे काम होत असल्याचे सांगत त्यांनी संस्थेच्या उपक्रमाचे कौतुक केले. व्याख्यानादरम्यान विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आवटे यांच्या मार्गदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पाटील व खजिनदार श्रीलेखा पाटील यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात ३२२ रक्तदात्यांनी रक्तदान केले. अक्षय ब्लड बँक व सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील ब्लड बँकेच्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रक्त संकलनाचे कार्य केले. हे शिबीर श्रीराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील, मार्गदर्शक श्रीलेखा पाटील, सचिव ॲड. अभिषेक पाटील व उपाध्यक्ष करण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडले. व्याख्यानाच्या उत्तरार्धात जयवंत आवटे यांनी सादर केलेल्या ‘जाणती’ या कथेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सदा आणि नाग्या यांच्यातील मिश्कील संवाद, ग्रामीण जीवनातील गमती-जमती, लग्नानंतरचे कौटुंबिक प्रसंग आणि पती-पत्नीच्या नात्यातील विनोदी बारकावे त्यांनी आपल्या खास शैलीत उलगडले. त्यांच्या प्रभावी कथनाने विद्यार्थ्यांमध्ये हास्याची लाट उसळली. विनोदाच्या माध्यमातून कौटुंबिक नात्यांतील प्रेम, जिव्हाळा आणि माणुसकीचे महत्त्वही त्यांनी या वेळी अधोरेखित केले.

३२२ रक्तदात्यांनी केले रक्तदान



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *