![]()
शिरपूर तालुक्यातील लालमाती ते खंबाळे गावाच्या शिवारात एका पुरुषाचा गळफास घेतलेला मृतदेह आढळला होता. चौकशीअंती मृत व्यक्ती मध्य प्रदेश पोलिस दलातील हेड कॉन्स्टेबल रवी कनोसे हे असल्याचे समोर आले. आत्महत्यापूर्वी त्यांनी पत्नीला सेल्फी फोटो व्हॉट्सॲपवर पाठवला होता. नंतरच्या ४० मिनिटात त्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले. शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली. लालमाती गावाच्या शिवारात एका पुरुषाने चामडी पट्ट्याने गळफास घेतल्याचे समोर आले. चौकशीअंती मृतदेह रवी भगवान कनोसे (३४) यांचा असल्याचे समोर आले. ते मध्य प्रदेशातील वरला पोलिस ठाण्यात हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते. पोलिसांच्या शासकीय वसाहतीत ते राहत होते. मात्र, ते १ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपासून बेपत्ता असल्याने कुटुंबीय शोध घेत होते. शिरपूर पोलिसांनादेखील कळवले होते. दरम्यान, आत्महत्या करण्यापूर्वी रवी कनोसे यांनी शुक्रवारी दुपारी ३.५० वाजता पत्नीला सेल्फी फोटो पाठवला होता. मात्र, कोणताही संदेश दिला नव्हता. त्यानंतर ४.३० वाजता त्यांचा मृतदेह आढळला. त्यांच्याजवळ कोणतीही चिठ्ठी आढळली नाही. बेपत्ता झाल्यानंतर १८ तासांनी त्यांचा मृतदेह मिळून आला. याप्रकरणी तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले. साताऱ्यातही आत्महत्या सातारा पोलिस दलातील पोलिस कॉन्स्टेबल संतोष ननावरे (३६, रा. ओझर्डे, ता. वाई) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलादपूर येथील एका हॉटेलमध्ये त्यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. संतोष ननावरे हे सध्या भुईंज महामार्ग पोलिस मदत केंद्रात पोलिस अंमलदार म्हणून कार्यरत होते. त्यांनी पोलादपूर येथील एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन जीवन संपवले. त्यांच्या आत्महत्येचे कारण मात्र अद्याप समजू शकले नाही. याप्रकरणी तपास सुरू आहे.
Source link
पत्नीस सेल्फी पाठवून पोलिसाची आत्महत्या:शिरपूरची घटना, मध्य प्रदेशात होता कार्यरत