Headlines

सतीश चव्हाण पुन्हा एकदा रिंगणात:औरंगाबाद पदवीधरमधून राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार; सुनील तटकरेंकडून उमेदवारीचे पत्र सुपूर्द




औरंगाबाद पदवीधर विधानपरिषद मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने सतीश भानुदासराव चव्हाण यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून सतीश चव्हाण यांनी याअगोदर 2008, 2014, 2020, 2026 असे टर्म प्रतिनिधीत्व केलेले असल्याने पुन्हा एकदा पक्षाने त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे. याबाबतचे अधिकृत पत्र प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी जाहीर केले आहे. दरम्यान, विधानपरिषद निवडणुकीसाठी विविध मतदारसंघांतील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली असून, यामध्ये पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातून डॉ. स्मिता योगेश जाधव आणि नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून सुधाकर विठ्ठलराव कोहळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच, भाजपने पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ मुरलीधर गावडे यांना उमेदवारी जाहीर केली असून, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून औरंगाबाद पदवीधर मतदारसंघासाठी सतीश चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ही देखील बातमी वाचा.. पुणे पदवीधरसाठी 55, शिक्षकसाठी 28 अर्जांचे वाटप:आजअखेर पदवीधरसाठी 205 तर शिक्षकसाठी 1387 अर्ज वाटले गेले पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्ज वाटप प्रक्रियेला वेग आला आहे. शनिवार, ३ ऑक्टोबर रोजी पुणे पदवीधर मतदारसंघासाठी ५५ अर्जांचे वाटप झाले. हे अर्ज ३३ व्यक्तींनी घेतले. तर पुणे शिक्षक मतदारसंघासाठी २८ अर्जांचे वाटप झाले असून, १६ व्यक्तींनी अर्ज घेतले. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *