![]()
सौदीया ग्रुपची कमी खर्चात विमानसेवा देणारी प्रमुख कंपनी ‘फ्लायडील’ने भारत आणि सौदी अरेबिया दरम्यान आपल्या नेटवर्कचा विस्तार करत मुंबई ते रियाध दरम्यान थेट नॉन-स्टॉप उड्डाणे सुरू केली आहेत. जुलैमध्ये हैदराबाद येथे सेवा सुरू केल्यानंतर मुंबई हे फ्लायडीलचे भारतातील दुसरे महत्त्वाचे केंद्र ठरले आहे. नवीन सेवेमुळे दोन्ही देशांतील व्यवसाय, पर्यटन आणि प्रवासाला मोठा वेग मिळणार आहे. सोबतच मक्का-मदिना जाणारे भाविक आणि प्रवाशांचीही सोय होणार आहे. नवीन उड्डाणांची ठळक वैशिष्ट्ये आणि वेळापत्रक: प्रारंभ आणि वार: 3 ऑक्टोबर 2026 पासून ही सेवा सुरू झाली असून, आठवड्यातून 5 दिवस मुंबई-रियाध दरम्यान उड्डाणे होतील (सोमवार आणि शुक्रवार वगळून). अतिरिक्त आसने: या नवीन मार्गामुळे दोन्ही देशांदरम्यान दरमहा 7,400 हून अधिक नवीन आसनांची उपलब्धता वाढली आहे. विमानाचे स्वरूप: या मार्गावर अत्याधुनिक A320neo विमान चालवले जात आहे. यात 186 इकॉनॉमी सीट्स, प्रत्येक सीटवर USB-A व USB-C चार्जिंग पोर्ट्स, extra-large ओव्हरहेड बिन्स आणि एअरबसचे आधुनिक ‘एअरस्पेस केबिन इंटिरिअर’ देण्यात आले आहे. सोयीस्कर वेळा: मुंबईहून सकाळी उड्डाण करणारे विमान सकाळी 10:15 वाजता रियाधला पोहोचेल. प्रवाशांच्या सोयीसाठी थ्रू-फेअर आणि थेट अंतिम गंतव्यस्थानापर्यंत बॅगेज ट्रान्सफरची सुविधा उपलब्ध आहे. उड्डाणांचे सविस्तर वेळापत्रक (स्थानिक वेळेनुसार) कनेक्टिव्हिटी आणि धार्मिक पर्यटनाला बळ रियाध येथील टर्मिनल 4 चा वापर करून प्रवाशांना सौदी अरेबियातील अंतर्गत शहरांमध्ये सहज जाता येईल. तसेच जेद्दाह येथील अत्याधुनिक टर्मिनल 1 वरून मक्का आणि मदिना या पवित्र शहरांसाठी थेट बुलेट ट्रेनची सुविधा उपलब्ध आहे, ज्यामुळे उमराह व पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ होणार आहे. फ्लायडीलचे ॲक्टिंग सीईओ संजीव कपूर यांनी सांगितले की, भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी विमान वाहतूक बाजारपेठ असून सौदी अरेबियासाठी अत्यंत महत्त्वाचा धोरणात्मक भाग आहे. सौदी अरेबियाच्या ‘व्हिजन 2030’ ला पाठबळ देत, दोन्ही देशांतील प्रवाशांना परवडणाऱ्या आणि विश्वासार्ह दरात आंतरराष्ट्रीय दर्जाची सेवा देण्यासाठी कंपनी कटिबद्ध आहे.
Source link
रियाध-मुंबई थेट विमानसेवा सुरू:सौदी अरेबियाच्या 'फ्लायडील' एअरलाइनची मुंबईत धडक; मक्का-मदिना जाणाऱ्या प्रवाशांची सोय