![]()
राज्यात हवामानाचे दुहेरी रूप पाहायला मिळत आहे. मालेगावात ऑक्टोबर हीटचा चटका वाढला असून पारा ३८.४ अंशांवर पोहोचला आहे, तर दुसरीकडे पुणे, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मराठवाड्यातील अनेक शहरांमध्ये पारा ३७ अंशांच्या पुढे गेला आहे. दरम्यान, पुढील दाेन दिवस मध्य महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांत पावसाच्या सरींची शक्यता आहे. मालेगावात सोमवारी कमाल ३८.४ तर किमान १८.६ अंश तापमान नोंदवले गेले. दिवसा कडक ऊन व पहाटे गारवा असे चित्र आहे. नाशिकमध्येही ३४.६ अंश तापमान नोंदवले गेले. दुसरीकडे, बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे राज्यात पुन्हा पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. एक्स्पर्ट व्ह्यू: दिवसा ऊन, पहाटे थंडी आगामी सात दिवस उत्तर महाराष्ट्रात हवामान कोरडे राहण्याची शक्यता असल्याने तापमान वाढेल. दुपारी उन्हाचे चटके आणि पहाटे थंडी राहील, त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. – माणिकराव खुळे, हवामान तज्ज्ञ
Source link
ऑक्टोबर हीटचा चटका:मालेगावी पारा 38.4 वर, संभाजीनगरही 37 अंश पार; पुणे, कोकणासह मध्य महाराष्ट्रात पाऊस