![]()
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्याआखाड्यात महायुतीमधील अंतर्गतधुसफूस आता चव्हाट्यावर आलीआहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवारगट) चे विद्यमान आमदार सतीशचव्हाण यांनी सोमवारी महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणूनशक्तिप्रदर्शनात अर्ज दाखल केलाअसला, तरी भाजपच्या गोटात मात्रतीव्र नाराजीचा सूर उमटला आहे. यानाराजीतूनच भाजपचे मराठवाडामतदार नोंदणी सहप्रमुख एम. के.देशमुख आज (मंगळवार, ६ऑक्टोबर) आपला उमेदवारी अर्जदाखल करणार आहेत. पुणे शिक्षक आणि अमरावतीपदवीधरप्रमाणेच मराठवाड्यातही मैत्रीपूर्ण लढत लढू द्यावी, अशी थेटमागणी त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली.अमरावती पदवीधरमध्ये सर्व पक्षांनीआपले उमेदवार दिले आहेत. पुण्यातशिंदेसेना रिंगणात आहे. मगमराठवाड्यावरच अन्याय का?आम्ही दीड लाख पदवीधरांची नोंदणीकेली आहे. कार्यकर्त्यांच्या घामाचेमोल व्हावे यासाठी श्रेष्ठींनी आम्हाला मैत्रीपूर्ण लढतीची मुभा द्यावी, असेदेशमुख म्हणाले. तर पदवीधरचाअर्ज दाखल करण्यासाठी मलाअधिकृत निरोप नव्हता. निरोपअसो-नसो मी रस्त्यावर उतरून कामकरणारा कार्यकर्ता आहे, युतीचविजयी होईल, असे माजी आमदारसंजय केणेकर म्हणाले. बालेकिल्ला सोडल्यानेभाजपचे केडर संतप्त मराठवाडा पदवीधरमतदारसंघाचा इतिहास पाहिला तर१९७८ ते २०२० पर्यंत भाजपने ही जागासातत्याने लढवली. यंदा ही जागा थेटअजित पवार गटाला सोडल्यानेतळागाळातील कार्यकर्त्यांमध्येसंतापाची लाट आहे. सोमवारी आ.चव्हाण यांच्या अर्ज भरण्याच्या वेळीभाजप व शिंदेसेनेचे प्रमुख नेतेमंचावर दिसले खरे; मात्र पक्षाचेमाजी आमदार संजय केणेकर आणिभाजप शहराध्यक्ष किशोर शितोळेयांच्यासह अनेक प्रमुख स्थानिकचेहऱ्यांची दांडी राजकीय वर्तुळातचर्चेचा विषय ठरली.
Source link
मराठवाडा पदवीधरमध्ये महायुतीत पडली उभी फूट:पुणे, अमरावतीप्रमाणे मैत्रीपूर्ण लढतीची मागणी