Headlines

सांगली शहरात इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार:पीडित 20 वर्षीय तरुणी मूळ सातारा जिल्ह्यातील रहिवासी




ईश्वरपूर परिसरात इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणाऱ्या एका २० वर्षीय विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शीतपेयातून गुंगीचे औषध पाजून लॉजवर तिच्यावर अत्याचार करण्यात आला. याप्रकरणी ईश्वरपूर पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन्ही संशयित आरोपींना अटक केली आहे. पीडित तरुणी मूळची सातारा जिल्ह्यातील असून ती सध्या ईश्वरपूर येथे राहून शिक्षण घेत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी या तरुणीला ईश्वरपूर-कामेरी रस्त्यावरील एका लॉजवर नेले. तिथे तिला शीतपेयातून गुंगीचे औषध पाजण्यात आले. ती बेशुद्धावस्थेत असताना दोन्ही आरोपींनी तिच्या इच्छेविरुद्ध सामूहिक अत्याचार केला. जीवे मारण्याची धमकीही दिली ‘घडलेला प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारू’ अशी धमकी देत आरोपींनी तरुणीला मारहाणही केली. मात्र, या घटनेनंतर पीडितेने हिंमत दाखवून थेट ईश्वरपूर पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखत तातडीने सूत्रे हलवली. शार्दुल पाटील (२१, रा. रेठरेधरण, ता. वाळवा) आणि सचिन पाटील (रा. ईश्वरपूर) अशी या गुन्ह्यातील अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *